चैतन्यसखा श्रावण


यंदा लॉकडाऊनमुळे घरात असताना, आसपासच्या निसर्गाकडे जरा लक्ष देऊन बघत असाल ना? काही पक्षी, कीटक, पाने-फुले यांच्याशी नव्याने ओळख झाली असेल. ‘सृष्टीचा पाचवा महिना’ कसा बहरलाय पाहा! 'वयम् ' मासिकाच्या ... महिन्याच्या अंकातील हा लेख मुद्दाम पुन्हा तुम्हाला वाचायला देत आहोत-

श्रावण तर निसर्गातली नवनिर्मिती मनसोक्त अनुभवण्याचा महिना. नजर फिरेल तिकडे हिरव्याच्या असंख्य छटांची बहार डोळ्यांना सुखावत रहाते. काळ्याभोर जमिनीवरही दाट, हिरवी मखमल पसरते. डोंगराच्या भरल्या कुशीतून शुभ्र पांढरे, फेसाळ झरे झुळझुळत राहतात. ऊन-पावसाचा खेळ सुरु होतो. आकाशात अधून मधून इंद्रधनुष्याची कमान झळकताना दिसते. गवताच्या पात्यांवर पावसाच्या थेंबांचे मोती चमचमत राहतात. जाई-जुई, प्राजक्ताची रांगोळी हिरव्या रंगावर अलगद रेखाटली जाते आणि एक तृप्त ओलं समाधान सगळ्या आसमंतात भरून राहतं. मनाचं कोवळेपण शिल्लक असेल तर अगदी शहरी वातावरणात सुद्धा ऋतूंचा स्पर्श झालेला समजतोच आपल्याला. त्यांचे रंग-गंध आपल्या मनावरही पसरून राहतात. आणि श्रावण म्हणजे तर रंग-गंधांचा उत्सवच! तो पहाताना आठवतं आपलं निरभ्र बालपण. ऊन-पावसाच्या पाठशिवणीच्याखेळात त्यावेळी आपणही किती मनापासून सामील झालेलो असतो! पावसाच्या हलक्या सरी झेलत मृगाचे लाल मखमली किडे पहाताना आणि ओळखी-अनोळखी फुलांचे रंग-गंध टिपताना आपणही श्रावणच होऊन गेलेलो असतो! लहानपणीचं हे मैत्र या दिवसांत पुन्हा जागं होतं. भवतालाशी स्वतःला जोडून घेण्याची उर्मी अनावर होते. श्रावणातल्या प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीची पूजा करण्याची प्रथा महाराष्ट्रात वर्षानुवर्षं चालू आहे. खरं तर ही निर्मितीचीच पूजा आहे. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


ललित लेख , वयम् , पर्यावरण , समाजकारण
ललित

प्रतिक्रिया

  1. Mukund Deshpande

      3 वर्षांपूर्वी

    श्रावणाचे सुंदर, समर्पक वर्णन

  2. Rajesh Jadhav

      3 वर्षांपूर्वी

    खूपच छान लेख ..अप्रतिम!!!

  3. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    खुपच सुंदर मांडलाय श्रावण. नागपंचमीचं वर्णन फारच सुंदर आणि नागाला आदिपुरुष म्हटलय ही कल्पनाही आवडली.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen