राष्ट्रीय प्रतिज्ञा कोणी लिहिली ?


१५ ऑगस्टला झेंडावंदन करताना आपण आपली प्रतिज्ञा म्हणतो. ही प्रतिज्ञा कोणी लिहिली, माहितीये? वाचा, 'वयम्' मासिकात २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख, आज पुन्हा!   

देशभरातील शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये ​सुरुवातीलाच ​​'प्रतिज्ञा​’ असते. ​आपण रोज ती म्हणतो. ​ही प्रतिज्ञा कोणी लिहिली? कधी लिहिली? ती केव्हापासून देशातील पाठ्यपुस्तकांमध्ये आली? ​या लेखकाने ​​​संशोधन करून ही माहिती मिळवली. वाचा तर, कोण आहेत आपल्या प्रतिज्ञेचे जनक! देशभरातील शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये सर्वत्र एक समान प्रतिज्ञा प्रत्येक विषयाच्या पुस्तकामध्ये सुरुवातीलाच दिलेली असते. अनेक वर्षांपासून आपण नित्याचा परिपाठ म्हणून शाळा भरताना ही प्रतिज्ञा घेत आलो आहोत. परंतु ही प्रतिज्ञा कोणी लिहिली? कधी लिहिली? ती केव्हापासून देशातील पाठ्यपुस्तकांमध्ये आली? याची माहिती जवळपास कुणालाच दिसत नाही. मी पण ही प्रतिज्ञा शालेय जीवनापासून म्हणत आलो आहे.बालवयात पाठ्यपुस्तकातील एखादा पाठ किंवा कविता वाचली किंवा त्या कवितेखाली त्या त्या लेखकाचे, कवीचे नाव दिलेले असते. मला बालपणापासून हा प्रश्न पडला होता की, आमची ही प्रतिज्ञा कोणी लिहिली असेल? कारण या प्रतिज्ञेच्या खाली कोणाचेच नाव नव्हते. मला शिकवणा:या ब:याच शिक्षकांना मी हा प्रश्न विचारला, परंतु मला उत्तर मिळाले नाही. पुढे मी बऱ्याच विद्वान व्यक्तींशी याबाबत चर्चा केली, पण त्यांच्याकडूनही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. काहींनी साने गुरुजींचे नाव सांगितले, तर काहींनी यदुनाथ थत्ते यांचे नाव सांगितले. काहींना वाटले, ही प्रतिज्ञा गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिली ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. Shruti Ronghe

      5 वर्षांपूर्वी

    khup sundar Mahiti Milali!! thank you for sharing



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen