चीनच्या दक्षिण भागात एक भातशेतीचं गाव आहे, लॉंगजी नावाचं. त्याच परिसरात व्हांगलो या अगदी छोट्याशा खेड्यात ‘रेड याओ’ नावाची जमात राहते. या जमातीतील महिलांचे केस त्यांच्या उंचीएवढे लांब असतात. ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस’मध्ये व्हांगलो हे ‘लांब केसांचं गाव’ म्हणून नोंदवलं गेलंय. त्या गावातील सफरीचा हा अनुभव-
जर्मनीतील बालगोपाळांची, सिंड्रेलाइतकीच लाडकी एक परीकथा आहे. तिचं नाव रंपुझेल. रंपुझेल हे खरं तर एका हिरव्यागार पालेभाजीचं नाव. रंपुझेलची आजारी आई ही भाजी खाल्ल्याने सशक्त झाली आणि म्हणूनच रंपुझेलला जन्म देऊ शकली. मात्र ही भाजी होती, एका छोट्या चेटकिणीच्या शेतात. तिने भाजी देण्यासाठी एक कठीण अट घातली. रंपुझेलच्या जन्मानंतर चेटकीण तिची आई बनून तिचा आजन्म सांभाळ करणार. तिने तसा प्रयत्न केलासुद्धा. रंपुझेल तारुण्यावस्थेत आली, तेव्हा खूप सुंदर दिसायला लागली आणि तिचे केसही लांबसडक झाले. चेटकिणीने मग तिला इतरांच्या नजरेपासून दूर एका मनोऱ्यात डांबून ठेवलं. त्याला ना जिना होता, ना दरवाजा. एकच लहानशी खिडकी होती. चेटकीण रोज तिच्यासाठी जेवण घेऊन यायची. खालून तिला साद घालायची- ‘रंपुझेल, रंपुझेल तुझे लांबसडक केस खाली सोड.’ मग दोरावरून चढून वर जावं तशी त्या केसांना धरून चेटकीण वर चढत असे. एकदा एका राजकुमाराने रंपुझेलचे केस पाहिले, तिचा आवाज ऐकला आणि तो तिच्या प्रेमात पडला. एके दिवशी त्याने चेटकिणीच्या आवाजाची नक्कल करून, केसांच्या दोरावरून मनोऱ्यात प्रवेश मिळवला. खूप अडचणींवर मात करून त्याने रंपुझेलची त्या कैदेतून सुटका केली. ही झाली ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
jrpatankar
5 वर्षांपूर्वीछान.