‘वयम्’ ‘गणपती विशेषांक २०२०’

वयम्    शुभदा चौकर    2020-08-28 23:48:46   

हॅलो फ्रेंड्स, गेले चार महिने ‘वयम्’ मासिकाचा छापिल अंक प्रसिद्ध झाला नाही. या चार महिन्यांच्या विरामानंतर गणेशोत्सवानिमित्त डिजिटल रुपातला ‘गणपती विशेषांक २०२०’ ‘वयम्’ मासिकाने वाचकांसाठी ‘वयम्’च्या वेबसाइटवर प्रसिद्ध केला आहे. हा अंक निःशुल्क आहे. या गणपती विशेषांकात ‘वयम्’ मासिकात २०१३ ते २०१९ मध्ये प्रसिद्ध झालेले काही साहित्य आपण एकत्रित रूपात देत आहोत. काही नवे साहित्यही आहे.

यात बुद्धी आणि कृती यांचा समन्वय होण्यासाठी गणपती उत्सव हे माध्यम लोकमान्य टिळक यांनी वापरले, स्वराज्यासाठी. त्यांची कल्पना काय होती, हे त्यांच्या १००व्या स्मृतिवर्षात समजावून देणारा लेख विकास परांजपे यांनी लिहिला आहे. शिवाय गणपती कसा बनतो याची उद्योग भेट आहे. तसेच बदलणाऱ्या काळानुसार इको फ्रेंडली बाप्पा, खट्याळ बालगणेश, तूप मूर्ती बनवणाऱ्या कारागीरांच्या मुलाखतीही आहेत. गणपती आणि माती यामागील शास्त्रीय दृष्टीकोन समजावून सांगणारा डॉ. शरद काळे यांचा लेखही यात आहे. याचबरोबरीने बाप्पाविषयची चित्रकोडी, शब्दांच्या जन्मकथा शोधाशोध, मिनू, छोटा शेफ, कल्पक कला ही नेहमीची सदरेही आहे.

असा वैविध्यपूर्ण ‘वयम्’ ‘गणपती विशेषांक २०२०’चा अंक वाचण्यासाठी-https://wayam.in/mag/Ganpati-Visheshank-2020.pdf     या लिंकला क्लिक करा. घरी बसल्या बसल्या ‘वयम्’सोबत गणपती उत्सव वाचत वाचत साजरा करा. अधिक माहितीसाठी-  http://www.wayam.in या आमच्या वेबसाइटला अवश्य भेट द्या.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen