आईला अभ्यासाला लावून तिला परीक्षा द्यायला लावणाऱ्या मुलीची गोष्ट-
तास संपल्यावर कामतबाई टीचर्सरूममधे गेल्या तेव्हा त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या वर्गातील पल्लवी दबकतच त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली. “बाई एक विचारू?”.....पल्लवीने हळूच विचारले. “अगं विचार की.” बाई “बाई शाळेत येऊ न शकणाऱ्याना १०वीची परीक्षा कशी देता येईल? त्यासाठी काय करावे लागेल?” पल्लवीने विचारले. “का ग... अजून १०ची वर्ष सुरू झाले नाही तोच हा प्रश्न कुठून आला तुझ्या मनात? कुणाला बसायचेय परीक्षेला? बाईनी विचारले. “माझ्या आईला १०वीच्या परीक्षेला बसायचंय” ...तिच्या उत्तराने बाई क्षणभर चकित होऊन तिच्याकडे बघतच बसल्या. “हो बाई खरंच सांगते.” पल्लवीने गळ्याकडे हात नेऊन सांगितले. “अरे वा छान छान... पण मला सांग. तुझी आई सध्या काय करतेय?” बाईंनी विचारले. “माझी आई कचरा वेचते.” पल्लवीच्या उत्तराने बाई एकदम अवाक. कामत बाईंची अलीकडे या विभागातील महापालिकेच्या शाळेत बदली झाली होती. शाळेतील बहुतेक मुले गरीब परिस्थितीतील होती. शाळेच्या जवळपासच्या बकाल वस्तीत राहणारी होती. पण त्यांच्या पालकांचे व्यवसाय किंवा इतर कुठल्याच गोष्टींची बाईंना नीटशी कल्पना नव्हती. पल्लवी १०वीच्या वर्गातील चुणचुणीत आणि हुशार मुलगी होती, म्हणून बाईंचे तिच्यावर विशेष लक्ष होते, पण तिच्याही कुटुंबाबद्दल त्यांना आजवर काहीच माहिती नव्हती. भानावर येऊन बाईंनी विचारले- “तुझे वडील काय करतात?” “माझे वडील मी पाचवीत असताना बांधकामावरच्या अपघातात वारले. बांधकाम-मजूर होते ते. तेव्हापासून घरची आणि माझ्या शिक्षणाची सगळी जबाबदारी आईवरच येऊन पडली. आम्ही दोघीच घरी असतो. बाबा होते तोपर्यंत माझ्या आईला बाहेर ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .