‘तंबी दुराई’ म्हणून महाराष्ट्रातील वाचक ज्यांना ओळखतात, त्या मार्मिक लेखकाची ही मनस्वी गोष्ट-
नेहा आणि रिया दोघीही स्कूटीवर होत्या. स्कूटर चालवण्याचं दोघींचंही वय नव्हतं. दोघीही यावर्षी दहावीत होत्या आणि शाळा, क्लास, अभ्यास यातच दिवस जात होते. आज अचानक थोडं रिलॅक्स होण्याची संधी मिळाली. क्लासला अचानक सुट्टी मिळाली होती. दोघींचेही आई-बाबा घरी नव्हते आणि दोघींच्या आयांच्या स्कूटी सोसायटीच्या आवारात उभ्या होत्या. ठरलेला अभ्यास झाल्यावर दोघींनीही स्कूटर चालवून पाहण्याचा प्रयोग करायचं ठरवलं. स्कूटर शिकून झालेली होती, परंतु अजून नीट चालवता येत नव्हती. शिवाय कायद्यानुसार स्कूटर चालवण्याचं वयही झालेलं नव्हतं. सोसायटीच्या गेटपासून रस्त्यापर्यंत म्हणजे साधारण अर्धा किलोमिटर जाऊन त्या परत आल्या. रहदारीच्या रस्त्यावर जाण्याची काही त्यांची हिंमत झाली नाही. तिथून परतून गेटमधून सोसायटीच्या पार्किंगपर्यत जाता जाता दोघीही आपल्या पराक्रमावर खूश होत्या. दोघींनी आपापल्या स्कूटीवर बसूनच एकमेकींना टाळी दिली आणि त्या टाळीनंच घात केला. दोघींचाही तोल गेला. रिया स्कूटरसह खाली पडली आणि नेहाच्या स्कूटीनं समोर जाऊन थेट एका कारला धडक दिली. कारच्या एका हेडलाईटची काच फुटली. त्या काचेचे दोन-तीन तुकडे उडाले. पराक्रमाची सांगता या अवचित अपघाताने आणि कदाचित भावी संकटाने झाली. दोघींनाही फार काही लागलं नव्हतं. रियाच्या हाताला थोडंफार खरचटलं होतं. स्कूटी व्यवस्थित होती. नेहाच्या स्कूटीलाही काही झालं नव्हतं. दुपारी तीनची वेळ होती. सगळीकडे शांत शांत होतं. ही पार्किंगची मागची बाजू असल्यानं वॉचमननंही हा अपघात पाहिला नव्हता. “बरं झालं, कुणीच नाहीये, चटकन स्कूटी पार्क करून ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
sravindra2002
5 वर्षांपूर्वीछान!
jrpatankar
5 वर्षांपूर्वीछान.मुलांनी वाचायला हवा.
ssdabholkar
5 वर्षांपूर्वीGood story