छोट्याशा आदुने लहान-मोठ्यांना दिलेली ही शिकवण...
“आदू, आईला त्रास देऊ नकोस. आई आता अजिबात तुला उचलून घेणार नाही. जरा आईची काळजी तू पण घेत जा आता. दादा होणारेस ना,” बाबा आदूला समजावत होता. आई दुसऱ्या बाळाला घेऊन येणार हे कळल्यापासून त्याला त्यासाठी तयार करायचे आदूच्या आईबाबांचे प्रयत्न सुरू होते. “पण म्हणजे आई आता मला कध्धीच उचलून घेणार नाही का रे बाबा.. आता फक्त बाळालाच घेणार ती? “ आदूला अजूनही नेमका अंदाज येत नव्हता की, मग आपण आईचे लाडके असणार की नाही ? “नाही रे. बाळ आईच्या पोटात आहे ना. ते खेळायला लागलं तुझ्यासोबत की, मग घेईल की परत तुला पण उचलून. पण आत्ता आई दोन बाळांना कशी उचलणार? पेलवणार नाही ना तिला? डॉक्टरआज्जी काय म्हणाल्या माहितीय का तुला? त्या आईला म्हणाल्यात काहीच जड उचलायचं नाही आणि आता आदू पण स्ट्राँग होतोय. आदूचं वजन पण आता वाढतंय ना. मग आईने आदूला उचलून घेतलं तर तिला त्रास नाही का होणार?”, बाबा त्याच्या परीने आदूला समजावत होता. “बाबा, मग मला जवळ पण नाही घेणार ती”, पुन्हा आदूने विचारलं. मग मात्र आईच मध्ये पडली. तिने आदूला जवळ घेतलं आणि म्हणाली, “असं कसं होईल? आदूला जवळ घेतल्याशिवाय आईलाच छान नाही वाटणार. आदूला जवळ घेतल्याशिवाय आईला पण झोप येत नाही... हो ना...” आईने दिलेल्या दिलाशानंतर आदू जरा खूश झाला. “आदू आईला दुधाचा पेला नेऊन देतोस का रे जरा”, आजीने स्वयंपाकघरातून हाक मारली. आदू साडेपाच वर्षांचा आहे. पण तो तीन-साडे तीन वर्षांचा असल्यापासूनच स्वतःचा दुधाचा ग्लास, ताट नेऊन ठेवायला शिकला होता. त्याला आवडायचं ते करायला. आजीचाही चहा पिऊन झाला की तो म्हणायचा की, तू नको उठू. तुझी कंबर दुखते ना. मीच नेऊन ठेवत ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .