खोटी गोष्ट

वयम्    गणेश मतकरी    2020-09-17 12:19:46   

दोन्ही वेळा मी बोललो, ते खोटंच! का, कशासाठी? ते नाही सांगता येणार! पण दोन्ही वेळेला मला काय वाटलं ते मात्र तुम्हाला मनापासून माझ्या मनातलं खरं खरं सांगणारी ही गोष्ट!

‘लक्ष आहे का वेळेकडे?’ बाबा म्हणाले, तेव्हा मी पुस्तकातून वर पाहिलं. पावणेदहा झाले होते. शाळा पावणेअकराची असायची, त्यामुळे आंघोळ स्किप केली, तर अजून पंधराएक मिनिटं वाचत बसणं शक्य होतं. पण ते बाबांना कसं सांगणार? “अं, हो, उठतोच”, मी पुटपुटलो आणि वाचत राहिलो. मला आशा होती, की सल्ला देऊन ते पटकन उठतील आणि बाहेर पडतील. ड्रायव्हर मघाशीच येऊन थांबलेला होता आणि त्यांची नेहमीची निघायची वेळ होऊन आता अर्धा तास तरी झाला होता. पण ते उठले नाहीत. पलीकडेच पडलेला ‘इंडीअन एक्स्प्रेस’ त्यांनी उचलला, उघडला, मग पुन्हा बंद केला. मग म्हणाले, “आंघोळ तरी झालीय का तुझी?” आता काही सुटका दिसत नव्हती. मी मधे बोट घालून पुस्तक मिटलं आणि म्हणालो, “नाही, पण हे वाचायला लागणार. शाळेमध्ये लास्ट पिरीअडला इन्स्पेक्शन आहे, तेव्हा मला सगळ्यांसमोर एक स्टोरी सांगायचीय. म्हणून काहीतरी वाचतोय !” वाक्य तोंडातून बाहेर येईपर्यंत, ते तसं येणार याची मला अजिबात कल्पना नव्हती. खरं म्हणजे त्या दिवशी इन्स्पेक्शन बिन्स्पेक्शन काही नव्हतं आणि असतं, तरी इन्स्पेक्शनला मुलांना गोष्टी सांगायला कशाला लावतील? अगदी चौथीचा वर्ग असला म्हणून काय झालं! दोन सेकंद बाबा तसेच माझ्याकडे बघत राहिले. त्यांना तसं बघताना पाहून एक गोष्ट माझ्या लक्षात आली, ती म्हणजे आपण खोटं बोललो. माझ्या आठवणीत मी याआधी कधीही खोटं बोललेलो नव्हतो. हं, आता माझ्या क्लासमेट्सकडून त्यांनी कुणाला कशा थापा मारल्या याच्या गमती ऐकायला मिळायच्या आणि गोष्टीच ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .प्रतिक्रिया

  1. sravindra2002

      9 महिन्यांपूर्वी

    सुंदरवाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen