साधं, स्वच्छ माणूसपण

वयम्    शुभदा चौकर    2020-10-01 20:51:13   

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीचे हे वर्ष! २ ऑक्टोबर १८६९ हा महात्मा गांधीजींचा जन्मदिवस. जगभरात ज्यांना मान आहे, अशा या आपल्या नेत्याचे महानपण आपल्या लक्षात राहावे, म्हणून त्यांच्या या काही गोष्टी वाचा. ‘वयम्’ मासिकाच्या जानेवारी २०२०च्या  अंकात हा मजकूर प्रसिद्ध झाला आहे. या गोष्टी लिहिल्या आहेत श्रेष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांनी ‘असे होते गांधीजी’ या पुस्तकात. हे पुस्तक ‘पॉप्युलर प्रकाशना’ने प्रसिद्ध केले आहे.

गांधी तेव्हा दक्षिण आफ्रिकेत होते. वकिलीचं काम करीत होते. महात्मा म्हणून जगन्मान्य होण्याच्या फार पूर्वीची ही लहानशी गोष्ट आहे. घरातला संडास साफ करण्यासाठी पहाटे एक भंगी येत असे. तो आफ्रिकन होता. थंडीचे दिवस होते. पहाटे अंगावरची ऊबदार पांघरूणं बाजूला करणं हेदेखील कठीण काम होतं. गांधींच्या मनात विचार आला, “इतक्या थंडीत पहाटे येऊन हा भंगी आपला संडास साफ करतो. किती त्रासाचं काम असेल हे!” दुस-या दिवशी गांधींना पहाटे झोपून राहणं अशक्यच झालं. ते गुपचूप उठले. त्यांनी गरम चहा करून त्या भंग्याला दिला. स्वत: गांधी चहा पीत नसत. आता त्या कडाक्याच्या थंडीत गांधी रोज पहाटे उठून त्या भंग्याला चहा करून देऊ लागले. त्यालाही संकोच वाटू लागला. एक दिवस तो म्हणाला, “नको मी क्षुद्र माणूस. मला चहा करून देऊ नका.” गांधींनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि ते नुसते निर्मळ हसले. दुस-या दिवशी पहाटे कडाक्याच्या थंडीत उठून गांधी नेहमीप्रमाणे चहाचा पेला घेऊन उभे होते. त्या भंग्याचे डोळे भरून आले. आपल्या आफ्रिकन भाषेत थरथरत्या स्वरात तो गांधींना म्हणाला, “देव तुमचं भलं करो.”   गांधीजी सेवाग्रामच्या आश ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. Bhiseamit

      4 वर्षांपूर्वी

    खूप छान

  2. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    सुंदर



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen