मानवा, सोड तुझा अभिमान

वयम्    सुबोध जावडेकर    2020-09-25 15:25:10   

सुबोध जावडेकर हे विज्ञानकथा लेखक व विज्ञानलेखक म्हणून परिचित आहेत. त्यांची आत्तापर्यंत १६ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांच्या कथांचे सात भारतीय व तीन यूरोपियन भाषेत अनुवाद झाले आहेत. मेंदूविज्ञान हा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे. या विषयावर त्यांनी लिहिलेली 'मेंदूतला माणूस' (डॉक्टर आनंद जोशी यांच्या समवेत) व 'मेंदूच्या मनात' ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. सध्या ते प्राण्यांची बुद्धिमत्ता या विषयाचा विशेष अभ्यास करत आहेत. त्यांच्या अभ्यासातून जे ज्ञान हाती लागले आहे, त्यावर आधारीत हा लेख-

आपण पृथ्वीतलावरचे सर्वात प्रगत प्राणी आहोत, असा माणसाला मोठा गर्व असतो. आपण शेती करतो, गुरंढोरं पाळून दूधदुभतं मिळवतो, मोठ्यामोठ्या इमारती बांधतो, शहरं वसवतो, रस्ते बांधतो, प्रचंड धरणं बांधतो, दूरवर प्रवास करतो. अवजारं बनवतो. भाषा वापरुन एकमेकाशी संवाद साधतो. त्यामुळे संपूर्ण  जगात या सर्व बाबतीत आपण एकमेवाद्वितीय आहोत, असं आपल्याला वाटत असतं. पण आपल्या गर्वाच्या या फुग्याला टाचणी लावून त्यातली हवा काढून टाकायचं काम मुंगीपासून हत्तीपर्यंत अनेक पशुपक्षी आपाआपल्या परीनं करत असतात. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की मुंग्या शेती करतात. बिव्हर्स नावाचे प्राणी मोठाली धरणं बांधतात. हत्ती चित्रं काढू शकतात. कावळे अवजारं वापरतात. मधमाशा एकदुसरीशी बोलायला नृत्याची भाषा वापरतात. इतकंच काय पण मासेमारीसाठी वापरले जाणारे कॉर्मोरॅन्ट नावाचे पक्षी संपसुद्धा करतात. मानवानं शेती करायला सुरुवात केली ती सुमारे 12 हजार वर्षापूर्वी. त्याच्या तब्बल पाच कोटी वर्ष आधीपासून काही जातीच्या मुंग्या शेती करत आहेत. झाडाच्या पानांवर वाढणार्‍या विशिष्ट प्रका ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .प्रतिक्रिया

  1. [email protected]

      9 महिन्यांपूर्वी

    खुपच छान माहिती पूर्ण लेख.

  2. anantrao

      9 महिन्यांपूर्वी

    निसर्ग जगण्याची कला देऊन जन्माला घालतो, उपयोग करता आला पाहिजे. उत्तम माहितीवाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen