गाढव आणि चंद्र

वयम्    माधुरी पुरंदरे    2020-10-08 10:25:49   

तुम्ही आतापर्यंत ज्यांची पुस्तके वाचून त्यांचा फडशा पाडला असेल, ‘राधाचं घर’, ‘यशच्या गोष्टी’ ‘बाबांच्या मिश्या’ अशा अनेक पुस्तकांशी गट्टी जमवली असेल, त्या लेखिका माधुरी पुरंदरे. साहित्य अकादमी पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेली ही मोठ्ठी लेखिका प्राधान्याने लहान मुलांसाठी लिहिते.

एका गावात एक भांड्यांचा व्यापारी राहत होता. घरातच त्याचं दुकानही होतं. त्याचा व्यापार एकंदरीत चांगला चाललेला होता, कुठल्या गोष्टीची ददात नव्हती. तरीही तो खूश नव्हता. त्याच्या नाखुशीचं कारण होता, त्याचा शेजारी. खरं तर तो शेजारी म्हणजे एक साधाभोळा आणि सरळमार्गी इसम होता. गावातल्या कुणाशीही, अगदी ह्या भांड्यांच्या व्यापार्‍याशीही त्याचं भांडण नव्हतं. आपण बरे, आपलं काम बरं, आणि हो, आपलं गाढव बरं, असं त्याचं वागणं होतं. त्याच्याकडे खरंच एक गाढव होतं : चांगलं धष्टपुष्ट, गुटगुटीत आणि छान, गोंडस दिसणारं. अनेक प्रदर्शनांमध्ये आणि स्पर्धांमध्ये ह्या गाढवानं आपल्या मालकाला बरीच बक्षिसं आणि नावलौकिक मिळवून दिला होता. परगावाहूनही लोक मुद्दाम हे गाढव बघायला येत. नेमकं हेच त्या भांड्यांच्या व्यापार्‍याला खुपत होतं. निव्वळ मत्सर, बाकी काही नाही. ह्या मत्सरापोटीच आपल्या शेजार्‍याचं तळपट व्हावं, अशी इच्छा तो मनातल्या मनात करत असे. मनातल्या मनातच त्यानं अनेक कारस्थानंही शिजवली, पण प्रत्यक्षात काही करणं जमेना. अखेर, एक दिवस त्यानं संधी साधली. शेजारी आपल्या गाढवाला घेऊन फिरायला गेलेला असताना, व्यापारी गुपचूप त्याच्या तबेल्यात शिरला. तिथे एका मोठ्या घमेल्यात गाढवाचं खाणं तयार करून ठेवलेलं होतं. व्यापार्‍यानं एका विषारी वनस्पतीचा ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘वयम्’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.