शब्दांच्या जन्मकथा : वाचन

वयम्    मंजिरी हसबनीस    2020-10-15 04:04:27   

१५ ऑक्टोबर हा  डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन 'वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त वाचन, लेखन या विषयावरची ही गोष्ट! ‘वयम्’ मासिकाच्या ऑक्टोबर २०१५ च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा मजकूर-

वाचणे हा शब्दच मुळात गमतीशीर आहे नाही.. पुस्तकं वाचणे, ग्रंथ वाचणे, वर्तमानपत्र वाचणे, लेख वाचणे, कविता वाचणे असा सगळया वाचन-संस्कृतीशी त्याचा संबंध आहेच, शिवाय मारापासून वाचणे, पावसापासून वाचणे, कुणाच्यातरी ओरड्यापासून वाचणे, अर्थात स्वसंरक्षण करणे असाही त्याचा अर्थ होऊ शकतो. थोडक्यात हा शब्द असा द्व्यर्थी म्हणजे दोन अगदी भिन्न अर्थ असलेला आहे. अशा शब्दांचीही मजा लुटताना एक वेगळाच आनंद मिळतो ! ‘सूर्य उगवला झाडीत, वाघ मेला लाथा झाडीत, म्हातारी होती रस्ता झाडीत, सैनिक निघाला गोळ्या  झाडीत’ या चारही ठिकाणी 'झाडीत’ शब्दाचे अगदी भिन्न भिन्न चार अर्थ आहेत. अशाच शब्दांचा यथोचित वापर करून अतिशय सुंदर असे मथळे वृत्तपत्रांमध्ये दिलेले असतात. उदाहरणार्थ, 'लक्ष्यावर असू दे लक्ष’. किंवा 'वाचाल तर वाचाल’. यातील 'वाचाल तर वाचाल’ हे मात्र अक्षरश: खरं आहे. हो ना? अहो, यासंबंधी अगदी सुंदर आणि मनोरंजक अशी गोष्टही आहे. ती ऐकायला तुम्हांला खूपच आवडेल. एक आटपाट नगर होतं. त्या नगरीचा राजा होता बलाढ्य चित्रसेन. या चित्रसेनाला सात राजकन्या होत्या. राजाच्या अतिशय लाडक्या. त्या दिवसभर आनंदात बागडत, खेळत, मिष्टान्न खात, सजतधजत आणि रात्री झोपी जात. दिवसभर चैन करणं हाच त्यांचा उद्योग होता. मात्र सातवी राजकन्या त्यांच्यात थोडी वेगळी होती. ती खेळत असे. पण त्याचबरोबर अभ्यासही करी. दिवसभर खेळली तरी रात्री धूळपाटी गिरविल्याशिवाय ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘वयम्’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.प्रतिक्रिया

  1. Ashwini Barve

      3 महिन्यांपूर्वी

    मला हा लेख खूप आवडला.शब्द कसे निरनिराळ्या ठिकाणी आपले अर्थ घेवून येतात.हे फार छान सांगितलं आहे.वाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.