१५ ऑक्टोबर हा डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन 'वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. ‘वयम्’ मासिकाच्या ऑक्टोबर २०१५च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख, आज तुम्हा सर्वांना वाचायला देत आहोत-
वाचनानी मला खूप काही दिलंय... अगदी भरभरून दिलंय. नवनवे अनुभव, विचार, दृष्टिकोन हे तर नक्कीच. पण त्या पलीकडे जे काही मी वाचनाच्या सोबतीने अनुभवलं, ते आज मला तुमच्याशी शेअर करायचंय. एक आई म्हणून मी माझ्या मुलीबरोबर जी जी मजा केली, त्यात पुस्तकांचा क्रम पहिला आहे. ती अगदी तान्ही असतानाही मी तिला रोज काहीतरी वाचून दाखवायची आणि तीही माझ्याकडे टक्क बघत ते शांतपणे ऐकायची. तिला काय कळायचं, काय माहीत! पण तिला ते आवडायचं बहुतेक. तिच्या वयाच्या दुसऱ्या-तिसर्या वषार्पासून आम्हां दोघींचं एकत्र वाचन सुरू झालं. माधुरी पुरंदरेंच्या चित्रवाचनाचे मोठाले तक्ते, लाल पतंग, शेपट्या अशी NBT ची चित्रमय पुस्तके, Highlights मासिकातील Find the Hidden Pictures मालिका, श्याम जोशींच्या मार्मिक चित्रांची पुस्तकं हातात घेऊन आम्ही मनसोक्त गप्पा मारायचो. एकेका चित्रावर आम्ही कित्ती प्रकारे बोलायचो! ती चार-पाच वर्षांची असताना आमच्या दोघींच्या एकत्र वाचनात 'राधाचं घर’, 'आमची शाळा’ अशी माधुरी पुरंदरेंची गोड पुस्तकं आली. ‘नॅशनल बुक ट्रस्ट’च्या छोट्या पुस्तकांतून मुकुंद टाकसाळे अनुवादित- 'बेगम गुलाबोमावशी’ आणि ‘भटकबहाद्दर बोकोबा’ आले. एका विदेशी प्रकाशनाचं 'लेमूर’ हे पुस्तक आम्ही वाचायचो. त्यातला लहानगा लेमूर जरा भित्रा होता. झाडावर उड्या मारायला घाबरायचा, आईच्या कुशीलाच चिकटून राहायचा. त्याला उड्या मारायला भाग पाडण्यासाठी त्याची आई एकदा त्याचा हात ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
bookworm
5 वर्षांपूर्वीमस्त!