अंक : अंतर्नाद दिवाळी २०२०
पं. अरविंद गजेंद्रगडकर हे मूळचे विज्ञानाचे शिक्षक. नंतर बनारस हिंदू विश्वविद्यालयात ते संगीताचे प्राध्यापक होते. त्यानंतर आकाशवाणीमध्ये संगीतसंयोजक म्हणून त्यांनी धारवाड़, पटणा, पुणे व नागपूर या केंद्रांवर काम केले. आकाशवाणी व दूरदर्शनच्या राष्ट्रीय कार्यक्रमांत, भारतातल्या जवळजवळ सर्व प्रमुख संगीत मैफलीत त्याचप्रमाणे परदेशातही अनेक ठिकाणी त्यांचे स्वरमंडल व बासरीवादनाचे कार्यक्रम झाले आहेत.
संगीताच्या परीक्षांसाठी उपयुक्त अशी पंधरा पुस्तके त्यांनी लिहिली असून महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ अशा विविध प्रतिष्ठित वृत्तपत्रांतूनही त्यांचे संगीतविषयक लेख १९६६ पासून प्रकाशित होत आहेत. संगीतक्षेत्रातील अनेक दिग्गजांचा जवळचा सहवास पं. गजेंद्रगडकर यांना अनेक वर्षापासून लाभला. त्यातल्याच काहींच्या आठवणी सध्या ते खास अंतर्नादसाठी लिहित आहेत. कुमारगंधर्व आणि ओंकारनाथ ठाकूर यांच्यानंतर या अंकात ते लिहित आहेत बेगम अख्तर यांच्याविषयी.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .