अंक : अंतर्नाद दिवाळी २०२०
मराठी साहित्यातील नवतेच्या पर्वाचे एक प्रवर्तक आणि श्रेष्ठ विचारवंत गंगाधर गाडगीळ आपलं परंपरेशी असलेलं नातं या खास अंतर्नादसाठी लिहिलेल्या लेखात उलगडून दाखवत आहेत.
********
परवाच एका चर्चासत्रात मला एक सिंधी प्राध्यापक भेटले. तेथल्या चर्चेत सिंधी भाषेची भारतात कशी दुर्दशा झाली आहे, ते त्यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडलं.
ते म्हणाले, "ह्या भारतात आम्हाला स्वतःचा असा प्रदेश नाही. त्यामुळे सिंधीला नित्याच्या व्यवहारात कुठेच स्थान नाही. साहजिकच महाराष्ट्रातले सिपी मराठी भाषिक होत आहेत. गुजराथेतले गुजराथी भाषिक होत आहेत. आता सिंधी भाषा फक्त सिंधीचे शिक्षक आणि प्राध्यापक बोलतात आणि सिंधी साहित्य तेच फक्त एकमेकांसाठी लिहितात आणि वाचतात. उलट पाकिस्तानात सिंधमधले मुसलमान सिंधी भाषा बोलतात आणि लिहितात. तिथलं सिंधी साहित्य तिथल्या भूमीत रुजलेलं आहे. आणि म्हणूनच सकस आहे."
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .