किती वर्ष झाली ह्या गोष्टींना? कधी कधी वाटतं, आठवतात ती दृश्य या जन्मीची नसावीच. पर्वतांच्या रांगा ओलांडून जावं तसं किती एक जन्म भरारा ओलांडत मागे मागे जात, कुठल्यातरी जन्मातल्या आठवणी जाग्या व्हाव्यात तशा या आठवणी. सगळ्या माझ्यात साठून राहिलेल्या हिमालयाच्या. किती एक बाजूंनी पाहिलेला, अनुभवलेला हिमालय. बरं, त्यांतही काही क्रम नाही. जसं आठवेल तसं. मात्र या आठवणींची सुरुवात मनालीहून होते आणि सध्या पुरता तरी शेवट मनालीतच होतो आहे. एक भव्य कॅनव्हास! या इतक्या वर्षांत मी पाहिलेली हिमालयातली दृश्यं, त्या त्या वेळी भेटलेली माणसं, अनुभवलेला निसर्ग आणि याच्या केंद्रस्थानी एक भव्यदिव्य झळाळती, तेजस्वी वास्तू हिमालय! जणू मी त्याभोवती विविध कोनांतून फिरते आहे आणि तो एखाद्या तटस्थ, अनादि-अनंत, निर्विकार इश्वरासम माझ्यामध्ये मांडी घालून ध्यानस्थ बसून राहिला आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Mukund Deshpande
4 वर्षांपूर्वीसुंदर माहिती पुर्ण प्रवास वर्णन
Ashwini Gore
4 वर्षांपूर्वीवाचतानाच त्यातली थरारकता जाणवत होती , डोळ्यासमोर चित्र उभं करणारं वर्णन , अप्रतिम !!
Anant Tadvalkar
4 वर्षांपूर्वीअप्रतिम ! हिमालय "या सम हा " असल्याचे आणखी एक प्रत्यंतर. संपूर्ण लेखन वाचून एकच गोष्ट लक्षात येते ती ही, की हिमालय ही नुसती पाहण्याची वस्तू नसून अनुभवण्याचा आनंद आहे. सुंदर. लेखन !