सममितीचा अन्वयार्थ


अन्वयाने मुंबई-अहमदाबाद हायवेवरून मनोरकडे गाडी वळवली तेव्हा जेमतेम सकाळचे अकरा वाजले असतील. गाडीतल्या एसीतूनही तिच्या नजरेला बाहेरच्या उन्हाची तलखी जाणवली. मे अजून सुरूही झाला नाही आणि एवढा उन्हाळा! भारतीय उपखंडातल्या उन्हाच्या लाटेची बातमी गेल्या काही दिवसांपासून मीडियाभर रणरणत होती. तशी अन्वया बातम्या वगैरे फारशा न बघणारी. गाडी चालवताना एफएमच्या आरजेने ही बातमी ओरडून सांगितलेली तिच्या कानांवर पडलीच. एवढे ऊन असूनही ती मस्तान नाक्याच्या पेट्रोल पंपाजवळ चहा घ्यायला गाडीतून उतरली. अवतीभवती उन्हाने त्रासलेले प्रवासी चेहरे, खास हायवेवर येणारा पेट्रोल, डिझेल आणि धुराचा वास. वाहनांमुळे जमिनीवरून उठून आडवे पसरणारे धुळीचे ढग.

चहाची सवय तिला ओंकारमुळे लागली. तो नेहमी तिला कॉफी घेण्यावरून टोमणे मारायचा. कॉफी हे एकलकोंड्या माणसांचे पेय आहे असे त्याचे उगीचच मत होते. त्याच्या सततच्या टोमण्यांमुळे तिने चहा घ्यायला सुरुवात केली आणि मग सवयच लागली. जवळ जवळ अॅडिक्शनच, विशिष्ट वेळी चहा नाही घेतला तर डोके दुखायचे. ओंकार स्वतःसुद्धा अप्रतिम चहा बनवायचा. किंचित मध घातलेला चहा ही तर त्याची खासीयत. अन्वया त्याला गमतीने म्हणायची, 'तू चहाची टपरी टाकलीस तर सॉफ्टवेअर डेव्हलप करताना मिळतात, त्यापेक्षा जास्त पैसे मिळवशील.'

डगमगीत टेबलावर पोऱ्याने आणून ठेवलेल्या धुरकट ग्लासाच्या आवाजाने तिची तंद्री तुटली. तिने मनातले ओंकारचे विचार झटकून टाकले. इथून पालघरला पोहोचायला अजून चाळीसेक मिनिटे. मग तिथे जिल्हाधिकारी ऑफिस. हे काम म्हणजे एक डोकेदुखीच.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. Swatita Paranjape

      3 वर्षांपूर्वी

    वेगळीच गूढ.

  2. मंदार केळकर

      3 वर्षांपूर्वी

    बुचकुळ्यात टाकणारी कथा



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen