ही गोष्ट आहे माटु आणि मकेनाची-एका बापलेकीची! मी ज्या मोंबासाच्या हॉटेलमध्ये नोकरी केली त्या हॉटेलमध्येच माझी या दोघांशी भेट झाली. तिथे नोकरी करत ही दोघंही. मी हॉटेलमध्ये रुजू झालो त्यानंतर पहिल्या काही दिवसांतच झाली माझी दोघांशीही ओळख. ही दोघं एकमेकांशी बापलेकीच्या नात्याने जोडलेली आहेत हे मला कुणी सांगितलं नाही आणि मला ते आधीपासून माहीत असायचं काही कारणही नव्हतं. ती दोघं एकमेकांपेक्षा प्रत्येक बाबतीत एवढी वेगळी होती की त्यांच्या एकमेकांशी असलेल्या नात्याची शंका कुणालाही आली नसती. माटु कागदोपत्री माझ्यापेक्षा वरिष्ठ हुट्यावर काम करत असे तर मकेना किचनमध्ये माझ्या हाताखाली एक शेफ म्हणून काम करत असे. दिसायला, वागायला, बोलायला, प्रत्येक बाबतीत, या दोनही व्यक्ती एवढ्या वेगवेगळ्या होत्या की त्या दोघांचं एकमेकांशी काही दूरचंही नातं असेल अशी शंकाच कुणाला येऊ शकली नसती. त्या दोघांनीही कधी आपसांतल्या नात्याचा सुरुवातीला माझ्याजवळ उल्लेख केल्याचं माझ्या स्मरणात नाही आणि मुख्य म्हणजे इतक्या जवळच नातं असल्यासारखं ते कधी इतरांसमोर वागलेही नाहीत. सतत एकमेकांबद्दल असलेलं वैर कपाळावर घेऊन वावरत ते. दोघांशीही माझी झालेली पहिली भेट मात्र लक्षात राहण्याजोगी होती.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Chandol Deshpande
4 वर्षांपूर्वीफारच रोमांचकारक
Yogesh Tadwalkar
4 वर्षांपूर्वीवाह! अतिशय उत्तम लिखाण. एकाद्या चित्रपटाची पटकथा वाचत असल्यासारखं वाटलं! स्थळं, व्यक्तिरेखा, प्रसंग, ताण, भावना हे सगळं खूपच सुंदर मांडलं आहे भागवतांनी. आणि अत्यंत विनयाने टाळलं असली तरी त्यांच्या सहृदयपणाची आणि नेतृत्वगुणांची झलक सुद्धा मिळत राहिली वाचताना खूप खूप धन्यवाद! 👏👏👏