सर्वलक्षणलक्षण्य:


हस्तिनापूर. अखिल भारतवर्षाची ही राजधानी, एखाद्या समाज्ञीसारखी. अठरा दिवसांच्या प्रलयंकर युद्धानंतर, संहार, विलाप आणि विराण शोकपर्वानंतर ही नगरी हळूहळू सावरते आहे. घराघरांतून ऐकू येणारे करुण विलाप आता थांबलेत. शरपंजरीवरून भीष्माने सांगितलेले विष्णुसहस्रनाम, देवकीनंदन कृष्णाचे भव्यदिव्य स्तुतिस्तोत्र रोज पहाटे हस्तिनापुरात ऐकू येते. घराघरांतले वृद्ध लहान मुलांना युद्धाच्या कथा सांगत आहेत. कृष्णाची नीती, त्याने सांगितलेला धर्म सांगत आहेत. धर्मसंस्थापनेसाठी त्याने जो विक्राळ संहार घडवून आणला-भीष्म-द्रोण-कर्णासारख्या प्रतापी योद्ध्यांचा वध घडवून आणला त्याच्या कथा ते सांगत आहेत. कृष्णाच्या धर्माने, युधिष्ठिराच्या सत्याने आणि भीमार्जुनांच्या पराक्रमाने कुरुवंशाचा ध्वज आज पुनश्च तेजाळतो आहे. मात्र या शांतीच्या समृद्धीच्या प्रभेवर अजूनही मृत्यूची सावली तरळते आहे. पांडवांचा एकमेव वंशांकुर, अर्जुनाचा नातू आता जन्माला येणार आहे. तो गर्भात असतानाच अश्वत्थाम्याने त्याच्यावर ब्रह्मशिरस अस्त्राचा प्रहार केला होता. त्या अस्त्राने पांडवांचा अखेरचा अंकुर खुडून टाकला आहे का? त्या अश्राप जीवाचा तरुण पिता चक्रव्यूहात अन्यायाने मारला गेला. त्याची आई केवळ त्याच्या जन्माच्या आशेने जिवंत राहिलेली आहे. भारतीय युद्ध खरेच संपले आहे, का हा अखेरचा बळी घेऊनच ते शांत होणार? सारे अस्वस्थ आहेत, मोठे मोठे पराक्रमी वीर दूरवर जाऊन उभे आहेत, पण ज्याने अस्त्रप्रहार झाल्यावर या बालकाचे रक्षण करेन असे वचन दिले होते, तो यदुकुलभूषण कृष्ण मात्र शांतपणे अंतःपुराबाहेर उभा आहे. तो वाट बघतो आहे.

आणि अचानक अंत:पुरातून शोक कल्लोळतो.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .प्रतिक्रिया

 1. Mukund Deshpande

    2 वर्षांपूर्वी

  चिंतनीय लेख

 2. Ashwini Gore

    2 वर्षांपूर्वी

  सखोल आणि चिंतनीय !!

 3. jyoti patwardhan

    2 वर्षांपूर्वी

  योगेश्वर कृष्णाचे चरित्र अवीट गोडीचे आहे. अतिशय सुंदर लेख. जय श्रीकृष्ण

 4. Pradnya Sathe

    2 वर्षांपूर्वी

  फार छान लेख .

 5. Shriniwas Kalantri

    2 वर्षांपूर्वी

  सुंदर , सखोल विवेचन

 6. Janhavi Godbole

    2 वर्षांपूर्वी

  खुप विस्तृत विवेचन केले आहेवाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen