सहचर


कॉलेजमधला तास संपला होता. दुसरे प्राध्यापक यायची वाट बघत आम्ही वर्गात उभ्या होतो. तेवढ्यात एका मैत्रिणीने मला हाताला धरून ओढत म्हटलं, "अगं, ते आपल्या कॉलेजात नवीन आलेले देव सर पाहिलेस का? ते बघ समोरून चाललेत." आम्ही तिघीचौघी जणी बाहेर गेलो. उंचसे, रेखीव चेहऱ्याचे देव सर घाईने निघाले होते. "ए! हँडसम आहेत ना? हिस्ट्री आणि सिव्हिक्स शिकवतात पण छान म्हणे!" माझ्या मैत्रिणी सांगत होत्या.

आमचे तासाचे सर तेवढ्यात आल्यामुळे चर्चा तिथेच थांबवून आम्ही वर्गात शिरलो. त्यानंतर काही देव सर लवकर दिसले नाहीत. पुढे काही दिवसांनी दिसले. कॉलेजच्या विविध मंडळांची कामं सुरू झाली. एक दिवस कला मंडळाचा एक सदस्य, माझा मित्र सुरेश बसाले मला म्हणाला,

"अगं, नाट्यवाचनाची निवड चालू आहे. तू का नाव देत नाहीस?"

"अरे, मला माहितीच नाही. कुणाकडे द्यायचं आहे नाव ?""

“विजय देव सरांकडे. ते कला मंडळाचे प्रमुख आहेत.”

मी स्टाफरूमकडे गेले. तिथे आमचा ज्येष्ठ हसरा शिपाई शंकर होता. त्याला म्हटलं,

"देव सर आहेत का?”

मला म्हणाला.

"कोणते देव सर? संस्कृतचे की सिव्हिक्सचे?” तेव्हा मला कारण कळलं नाही, पण विचारताना शंकरच्या चेहऱ्यावर मिष्किल हसू होतं. मला आता आठवतं अन हसू येतं! मी म्हटलं,

“कला मंडळाचे.”

 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मौज दिवाळी २०२० , व्यक्ती विशेष
व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया

  1. सुकृता पेठे

      4 वर्षांपूर्वी

    भावस्पर्शी लेख!

  2. Dr. Anil Sangle

      4 वर्षांपूर्वी

    एका समृद्ध सहजीवनाचा अत्यंत सुंदर पद्धतीने मांडलेला गोषवाराच आहे हा लेख…

  3. Jayashree Gokhale

      4 वर्षांपूर्वी

    अप्रतिम भावविश्व उभे केले.एका सम्रु्द्ध जिवनाचा आलेख दाखविला.सुंदर.

  4. Mukund Deshpande

      4 वर्षांपूर्वी

    ऊत्कृष्ट लेखन, मनाला भावनारे

  5. atmaram jagdale

      4 वर्षांपूर्वी

    खूपच भावस्पर्शी तरल लेखन वाटले . सहजीवनाच उत्तम उदाहरण म्हटलं पाहिजे .



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen