नेटफ्लिक्स रिलीज- नवीन टेरिटरी..


नेटफ्लिक्सच्या माध्यमातून आपला चित्रपट जगभरातील अनेक देशांत थेट घरात पोहचत असेल आणि त्या प्रक्षेपणाच्या हक्काची चांगली किंमत मिळत असेल तर या नवीन माध्यमाचा स्वीकार करणे हा झाला व्यवहार्य मार्ग. नेटफ्लिक्स रिलीज- नवीन टेरिटरी..... एव्हाना तुम्हालाही कल्पना आली आहे की, प्रियांका चोप्रा निर्मित आणि अरुणा राजे दिग्दर्शित 'फायरब्रॅन्ड 'https://www.youtube.com/watch?v=vMvg6LtskNc आणि माधुरी दीक्षित निर्मित आणि स्वप्नील जयकर दिग्दर्शित '१५ ऑगस्ट 'https://www.youtube.com/watch?v=q1YIJyf83tw हे चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रक्षेपित झाले. तसं पाहिलं तर या दोन्ही हिंदीतील आघाडीच्या अभिनेत्री. त्यामुळे त्यांचे चित्रपट भरपूर मिडिया हाईप आणि ग्लॅमरस प्रीमियर यांनी मल्टीप्लेक्समध्ये प्रदर्शित व्हायला हवे होते. अगदी युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया येथील मल्टीप्लेक्समध्येही त्यांचे चित्रपट प्रदर्शित व्हायला हवे होते ही झाली सर्वसाधारण अपेक्षा. पण नेटफ्लिक्सच्या माध्यमातून आपला चित्रपट जगभरातील अनेक देशांत थेट घरात पोहचत असेल आणि त्या प्रक्षेपणाच्या हक्काची चांगली किंमत मिळत असेल तर या नवीन माध्यमाचा स्वीकार करणे हा झाला व्यवहार्य मार्ग. 'फायरब्रॅन्ड ' नेटफ्लिक्सवर  सादर होत असल्याचे त्या चित्रपटातील कलाकारांनी ट्वीट केले इतकेच. "१५ ऑगस्ट 'च्या बाबतीत मात्र माधुरी दीक्षितने सवयीनुसार म्हणा अथवा हौसेखातर म्हणा, पण चक्क  तिने वांद्र्याच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एक दिवस तिने मिडियाला मुलाखती देण्यासाठी ठेवला. एक निर्माती म्हणून मुलाखती देण्याऐवजी तिने स् ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रपट रसास्वाद , नेटफ्लिक्स , स्वीकार नवीन डिजिटल माध्यमाचा

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen