एक बरा प्रयत्न म्हणून 'रॉ ' पाह्यला हरकत नाही. हिंदी चित्रपट बरेच नवीन वळण घेतोय, शहरी प्रेक्षकांना असे चित्रपट आवडताहेत. रॉ.... कॉन्सेप्ट तशी चांगली..... मद्रास कॅफे, राझी, उरी, परमाणु अशा चित्रपटांनी हिंदी चित्रपट बराच बदलतोय याचा प्रत्यय दिला. आजच्या पिढीतील पटकथाकार आणि दिग्दर्शक हिंदी चित्रपटात तरी मनोरंजनाची चौकट सांभाळत काही वेगळे करु पाहताहेत हे विशेष उल्लेखनीय आहे. मल्टीप्लेक्सच्या प्रेक्षकांना काही वेगळे पाह्यला नक्कीच आवडेल असाही त्यामागे दृष्टिकोन असावा. व्हायकॉम 18 मोशन पिक्चर्सचा रॉबी ग्रेवाल लिखित आणि दिग्दर्शित 'रॉ' अर्थात रोमियो अकबर वॉल्टर हा चित्रपटही तसाच नावापासूनच वेगळा. अगदी त्याचे कथासूत्रही वेगळे. पण त्याचा तेवढा प्रभाव मात्र पडू शकला नाही हेदेखिल तेवढेच खरे. 'रॉ'चे https://www.youtube.com/watch?v=HSHjC8VdzCM मध्यवर्ती सूत्र त्याच्या नावातच जाणवते. बॅकेत नोकरी करुन नाटकाची, अभिनयाची, विशेषतः एकपात्री कार्यक्रमाची हौस असलेल्या अकबरचा ( जॉन अब्राहम) वॉल्टर होण्यापर्यंचा गुंतागुंतीचा आणि प्रेक्षकांना काही धक्के देण्याचा प्रवास म्हणजे हा चित्रपट आहे. रॉचे प्रमुख श्रीकांत रॉय ( जॅकी श्रॉफ) हे अकबरला एका विशिष्ट कामासाठी नेमतात आणि चित्रपटाची गोष्ट पाकिस्तानच्या कराची शहरात घडू लागते. १९७१ च्या बांगला देश निर्मितीच्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युध्दाची पार्श्वभूमी याला आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला आणि तेव्हाच्या माहितीपटाचा भाग जोडून वास्तव कथेचा फिल दिलाय. दरम्यान, थीमनुसार काही अपेक्षित गोष्टी घडतात.हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
प्रतिक्रिया
रॉ.... कॉन्सेप्ट तशी चांगली.....
रुपवाणी
टीम सिनेमॅजिक
2019-04-07 10:00:47

वाचण्यासारखे अजून काही ...

पंडित मदनमोहन मालवियजींचे चरित्र - पूर्वार्ध
अज्ञात | 2 दिवसांपूर्वी
सक्तीशिवाय शिक्षण सार्वत्रिक करणें साधत नाहीं
देवमाणूस - उत्तरार्ध
गोपाळ गंगाधर पोतदार | 2 आठवड्या पूर्वी
हा माणूस अप्रामाणिक असून स्वभावानें विश्वासघातकी आहे
देवमाणूस - पूर्वार्ध
गोपाळ गंगाधर पोतदार | 2 आठवड्या पूर्वी
त्यानें कपडे काढले आणि स्वैपाकघरांत स्टो पेटविण्याचा आवाज ऐकू आला
माझा एक अकारण वैरी - उत्तरार्ध
पु. ल. देशपांडे | 2 आठवड्या पूर्वी
आप्पा प्रधान अशा आवाजांत गर्जू लागला कीं, फळीवरचा रेडिओ ऐकू येईना.