एंडगेम - थोडं समाधान थोडा अपेक्षाभंग


हा सिनेमा न आवडलेल्या निवडक लोकांना फक्त क्लायमॅक्स बघूनच पैसे वसूल झाल्याचा फील येईल. आणि वर बोनस म्हणून भावनेनं ओथंबलेला शेवट आहेच ज्यात एका वन टेक शॉटमध्ये आतापर्यंतच्या एकूण एक अॅव्हेंजरचा समावेश करण्यात आलाय. मी मार्व्हलचं एकही कॉमिक्स वाचलेलं नाही. मी MCU चा फॅनही नाही. पण मला त्यांचे बरेच चित्रपट आवडतात. कारण मला त्यांच्या सुपरहीरो पात्रांशी रिलेट करता येतं. कारण तुम्हा आम्हा प्रत्येकाला सुप्तपणे सुपरहीरो व्हायची इच्छा असते. कुणाला सुपरमॅनसारखं उडायचं असतं, कुणाला डोळ्यातून आग ओकायची असते, कुणाला स्पायडरमॅनसारखं हातातून जाळं सोडत भिंतींवर झपझप चढायचं असतं, कुणाला गायब व्हायचं असतं, तर कुणाला शंभर हत्तींचं बळ अंगात असावंसं वाटतं. प्रत्यक्ष आयुष्यात मात्र कुणाकडे पैशांची पॉवर असते, कुणाकडे सत्तेची पॉवर असते, तर घरातल्या ज्येष्ठांकडे लहान्यांची बंडखोर तोंडं बंद करणारी मोठेपणाची पॉवर असते. आणि म्हणूनच काल्पनिक सुपरहीरोंच्या फँटसी पॉवर्स प्रत्यक्षात मिळवणं शक्य नसल्याने पडद्यावर त्या घेऊन वावरणाऱ्या कूल लोकांचं आपल्याला आकर्षण असतं. त्यात जर अशा कूल लोकांची सगळ्यांना रुचेल पचेल अशी भेसळ करणारा किंवा जत्रा भरवणारा मार्व्हलसारखा ब्रँड असेल तर तीव्र भावनांच्या आनंदसागराला कसलाच धरबंध नसतो. MCU ने गेल्या ११ वर्षात जे साम्राज्य एकमेकांशी जोडणाऱ्या २१ चित्रपटांमधून उभं केलंय त्याला तोड नाही. गेल्या वर्षी आलेल्या इन्फिनिटी वॉरने MCU युनिव्हर्स काय हाईट गाठू शकतं हे खूप मोठया स्केलवर दाखवलं होतं. थॅनॉसला ह्युमनाईज करणं, तीसेक सुपरहीरोंचा समावेश असूनही सगळ्यांना समान स्क्रीन टाईम देणं, अनेक ट्विस्टस असूनही त्यांना हुशारीने हँडल करणं, व्हिलनला जिंकू देणं आणि शेवटपर् ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘रुपवाणी’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


चित्रपट रसास्वाद

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.