आदिनाथ कोठारे ने मारली बाजी/ ‘प्रभात’ आयोजित चित्रभारती महोत्सव


आदिनाथ कोठारे ने मारली बाजी जगभरात गाजलेले भारतीय चित्रपट पाहण्याची सुवर्णसंधी ‘प्रभात’ आयोजित चित्रभारती महोत्सव   न्युयॉर्क इंडीयन फिल्म फेस्टीवल – २०१९ मध्ये अभिनेता आदिनाथ कोठारेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्यामुळे तो स्वत: दिग्दर्शित करीत असलेला पाणी  हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पाणी हा चित्रपट मराठवाड्यातील दुष्काळी गावातील एका शेतकऱ्याने पाण्यासाठी केलेल्या संघर्षावर आधारीत चित्रपट आहे. आदिनाथ ह्या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करीत आहे. ह्या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या पर्पल पेबल्स ही निर्मिती संस्था पाणी चित्रपटाची निर्मिती करीत आहे. गेल्या एक वर्षापासून पाणी हा चित्रपटाला अनेक पुरस्कार प्राप्त होत असल्याने चर्चेत आहे. जगभरातील विविध नामांकीत चित्रपट महोत्सवांमध्ये भारतीय चित्रपटांना मानाचे स्थान आहे. २०१८ ह्या वर्षी अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आणि राष्ट्रीय पातळीवर काही भारतीय चित्रपटांना गौरविण्यात आले तर काही चित्रपट तेथील परिक्षक, समीक्षकांसह प्रेक्षकांवर प्रभाव टाकण्यात यशस्वी झाले. अशा सर्व भारतीय चित्रपट पाहण्याची मेजवानी सिनेरसिकांना मिळणार आहे.  प्रभात चित्र मंडळातर्फे दरवर्षी आयोजित केला जाणारा चित्रभारती हा भारतीय चित्रपटांचा महोत्सव यावेळी वेलिंगकर इन्स्टिट्यूट, मांटुंगा येथे दिनांक १४ मे ते १७ मे २०१९ दरम्यान रोज सायंक ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘रुपवाणी’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.