कोर्ट


ख-या अर्थाने सिनेमा असणा-या कोर्टला मराठी प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. ‘हा काय सिनेमा आहे?’ या पासून ‘अशा सिनेमाला सर्वोत्कृष्ट भारतीय सिनेमाचं अवॉर्ड मिळालच कसं?’ असे प्रश्न काही प्रेक्षकांना पडले.

कोर्ट

सिनेमा माध्यमाला स्वतःची भाषा आहे. या भाषेचा चपखल उपयोग चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित कोर्ट मध्ये केला गेलाय, यामुळेच ‘कोर्ट’ची जागतिक स्तरावर स्तुती झाली आहे. विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘कोर्ट’ची दखल घेतली गेली. समीक्षक व चोखंदळ प्रेक्षकानी ‘कोर्ट’ची वाहवा केली आहे. आणि भारतातील सर्वोत्कृष्ट चित्रपट असण्याचा सन्मानही त्याला मिळाला. आपल्या इथल्या सर्वसामान्य प्रेक्षकाला मात्र सिनेमाच्या या भाषेचा सराव झालेला नाही. त्यामुळेच ख-या अर्थाने सिनेमा असणा-या कोर्टला मराठी प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. ‘हा काय सिनेमा आहे?’ या पासून ‘अशा सिनेमाला सर्वोत्कृष्ट भारतीय सिनेमाचं अवॉर्ड मिळालच कसं?’ असे प्रश्न काही प्रेक्षकांना पडलेत. ‘कोर्ट’ला रुढार्थाने कथा नाही. पण जे प्रसंग आपल्याला पडद्यावर दिसतात ते मुंबईत घडतात, यातील काही प्रमुख पात्र मराठी आहेत व मराठी भाषा बोलतात म्हणून त्याला मराठी सिनेमा म्हणायचं अन्यथा ‘कोर्ट’ हा संवादाच्या पलिकडे जाणारा दृश्यात्मक आविष्कार आहे. या दृश्यप्रतिमातून दिग्दर्शक केवळ भारतीय न्याय व्यवस्थेचं अस्सल स्वरुपच दाखवीत नाही तर त्याचा अविभाज्य भाग असणा-या व त्यात अभावितपणे गुंतलेल्या माणसांच्या रोजच्या व्यवहाराचं व  मानसिकतेचा वेध घेतो. त्यांच्या व्यवसाया व्यतिरिक्त असलेल्या सामाजिक आर्थिक व सांस्कृतिक स्तराचं दर्शनही घडवतो. हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. bookworm

      6 वर्षांपूर्वी

    कोर्ट मी बघितला आणि विदारक वास्तव बघून वेगवेगळ्या नकारात्मक भावना अनुभवल्या. ह्या अनुभवातून प्रत्यक्ष गेलेल्यांची हालत काय होत असेल? भारत सोडून लोक दुसर्या देशांत स्थायिक होण्याचे हेही एक कारण असेल का?



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen