रवी जाधव: मराठी सिनेमाचे ‘कोडे’ सोडवलेला माणूस! लेखक-अभय साळवी रवी जाधव हे नाव मराठी चित्रपटसृष्टीत अगदी या नावाच्या ‘नाव’ होण्याच्या पहिल्या दिवसापासूनच मानाचं ठरलं आहे. गेल्या दशकभरात मराठी चित्रपट व्यवसायाला जे अधूनमधून चांगले दिवस आले आहेत, त्यात रवी जाधव हे ठळक नाव पुढे येतं... विषयापासून, त्याच्या हाताळणीसकट सिनेमाच्या एकूण मार्केटिंगसह जे व्यावसायिक गणित रवी जाधव या दिग्दर्शकाला उमजलं आहे ते कदाचित मराठीत दुसऱ्या कुठल्याच सिनेकर्त्याला उमजलेलं नाही! ‘नटरंग’, ‘बालगंधर्व’ सारखे सिनेमे मुळात व्यावसायीक ढंगात बसणारे कुणालाच वाटले नसावे पण इथे कथानक मांडण्याची पद्धत काहीशी प्रायोगिक आणि व्यावसायिक या दोन्ही प्रवाहांना एकत्र आणणारी होती. दोन्ही सिनेमांमध्ये कलेबद्दल असलेली भावना अशी काहीशी वैश्विक होती की प्रेक्षकाला प्रायोगिक, व्यावसायिक या सर्व भेदांपलीकडे ते सिनेमे भिडले, आजही भिडतात. हेच तंत्र रवी जाधवांच्या सिनेमांची स्वतःची एक ओळख निर्माण करतं. एकीकडे जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सची पार्श्वभूमी आणि त्याच सोबत जाहिरीतीच्या क्षेत्रात अनेक वर्षांचा अनुभव, इथेही दोन वेगळे टोक, दोन वेगळे प्रवाह या माणसाच्या व्यक्तीमत्वात एकाच वेळी दिसून येतात! यातलाच एक प्रवाह त्यांच्याकडून ‘न्यूड’ सारखा सिनेमा तयार करून घेतो आणि दुसरा आपण निर्माण केलेल्या कुठल्याही कलाकृतीला योग्य प्रेक्षकांपर्यंत योग्यरित्या पोहोचविण्याचं कसब सिद्ध करतो! ‘बालक पालक’ या सिनेमात विषय सहसा एखाद्या प्रायोगिक सिनेमात असावा तसा धाडसी होता मात्र त्याची हाताळणी पूर्णतः सर्व सामान्य प्रेक्षकांच्या परिचयाची आणि आवडीची होती. ‘बालक पालक’ आला तेव्हा जी काही हवा त्या सिनेमाभोवती निर्माण झाली होती त् ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
manisha.kale
6 वर्षांपूर्वीलेख आवडला. रवी जाधव यांच्या सिनेमाचे उत्तम परीक्षण केले आहे