मोठ्यांच्या सिनेमांमधली लहान मुलं हा खूप कठीण विषय आहे. इफ्फीमधले काही सिनेमे पाहताना ते खास जाणवलं. मग तो सिनेमा जपानचा असो की लातिव्हियाचा. महत्त्वाचं म्हणजे इथे लहान मुलांनामाणसांसारखं वागवलं जात होतं, खेळण्यांसारखं नाही. मात्र, यातही उठून दिसला तो जपानचा ‘लाईक फादर लाईक सन’ हा सिनेमालहान मुलांचं भावविश्व
लहान मुलं म्हणजे एक युनिट नसतं. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती ही म्हण त्यांनाही लागू पडते. पण तरीही त्यांचं स्वत:चं एक भावविश्व असतं. त्यांचं स्वत:चं काही म्हणणं असतं. प्रतिक्रिया असते, प्रतिसादही असतो. आपल्यासिनेमाच्या विषयाला अनुसरून दिग्दर्शकाला त्यामध्ये प्रवेश करायचा असतो. त्यासाठी काही वेळा स्वत:च्या लहानपणात डोकावून पहावं लागतं, तर कधी आजुबाजूला असलेल्या मुलांमध्ये त्याचा शोध घ्यावा लागतो.गोव्यामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये असं लहान मुलांचं भावविश्व दाखवणारे काही सिनेमे होते. भिन्न देशांचे, भिन्न विषयांचे. पण त्यात एक साधर्म्य होतंच. हे त्या त्या देशाच्या संस्कृतीचं वैशिष्ट्य की दिग्दर्शकाची प्रगल्भता हे ज्याचं त्याने ठरवावं, पण इथे मुलांना माणसांसारखं वागवलं जात होतं. त्यांच्याशी बोलताना खरं बोलायचं असतं, खोटं खोटं किंवा लाडे लाडे नव्हे. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं पूर्णप्रामाणिकपणे द्यायची असतात हे जणू सिनेमातल्या माणसांसाठी स्वाभाविक होतं. (आपल्याकडच्या सिनेमांमध्ये हे क्वचितच दिसतं. आणि प्रत्यक्ष आयुष्यातही आपण मुलांना कुठे समान वागणूक देतो?). उदाहरणार्थ, दिग्दर्शक यॅनिस नॉर्ड्स यांचा ‘मदर आय लव्ह यू’ हा लातिव्हियाचा सिनेमा. शाळेतल्या पाचवी सहावीतल्या रेमन्ड्स य ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .