७१ वा कान महोत्सव – २०१८


७१ वा कान महोत्सव – २०१८

७१ वा कान महोत्सव – २०१८

-    रेखा देशपांडे संपर्क साधनांनी आणि प्रसार माध्यमांनी अवघ्या जगातील यच्चयावत घडामोडींना सामावून घेतलं आहे. कोणत्याही देशातील कोणतीही वैशिष्ट्यपूर्ण बातमी आता फक्त त्या विशिष्ट देशाची उरलेली नसते. इलेक्ट्रॉनिक माध्यमं आणि त्यांच्याशी स्पर्धा करण्याच्या धडपडीत असलेली वृत्तपत्रसृष्टी आता जागतिक घडामोडींमध्ये मोठ्या प्रमाणावर रस घेताना दिसते. काही वर्षांपूर्वी अगदी आपल्या महत्त्वाच्या चित्रपटविषयक नियतकालिकांनाही कान महोत्सवाची दखल घ्यावीशी वाटत नसे. पण आज मात्र अगदी सगळी सगळी वृत्तपत्रं मे महिन्यात कान चित्रपट महोत्सवातल्या रेड कार्पेटवर डोळे खिळवून असतात. रेड कार्पेटचं ग्लॅमर, रेड कार्पेटवर ल`ओरिअलची ब्रँड एम्बॅसॅडर ऐश्वर्या राय ( मुळात ती ल`ओरिअलची ब्रँड एम्बॅसॅडर आहे याचा आम्हा भारतीयांना कोण अभिमान!) कोणत्या रंगाच्या किती घेराच्या इव्हिनिंग गाऊनमध्ये येणार, तिच्या व्यतिरिक्त बॉलीवूडच्या आणखी कोणत्या भारतीय अभिनेत्री कोणत्या पोषाखात रेड कार्पेटवर चालणार, याच्याच चर्चा कान महोत्सव म्हटलं की प्रसार माध्यमांतून रंगताना दिसतात. पण रेड कार्पेट हे कान महोत्सवाचं फक्त दर्शनी पान आहे. प्रत्यक्ष पायऱ्या चढून ग्रँड थिएटर ल्युमिएच्या आत शिरलं की पंधरा दिवस जगभरातल्या निवडक चित्रपटांचा, त्याबरोबरच त्या संकुलातल्याच शेजारच्या देबूसीमध्ये आणि इतर अनेकानेक लहान-मोठ्या थिएटर्समधून प्रदर्शित होणारे चित्रपट, दोन मजल्यांवर मिळून सजलेलं विशाल फिल्म मार्केट, परिसरातच फ्रेंच रिव्हिएराला लगटून उभी राहिलेली वेगवेगळ्या देशांची पॅव्हिलियन्स, संकुलात पत्रकारांसाठी खास असलेल्या प्रे ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen