राऊंड अप दिवस तुझे हे ‘बंद’ पडायचे... दिलीप ठाकूर मुंबई आणि अगदी महाराष्ट्रात काय, देशाच्याही शहरी अथवा ग्रामीण भागात एकादे जुने सिंगल स्क्रीन थिएटर अर्थात एकपडदा चित्रपटगृह बंद झाल्याच्या वास्तवाने अचंबित अथवा एकदम भावूक वगैरे होण्याचे दिवस एव्हाना मागे पडलेत. हां, ती एका दिवसाची बातमी असते आणि त्यानिमित्ताने पुन्हा एकदा 'अशा एकपडदा चित्रपटगृहांचे भवितव्य काय?' असा प्रश्न चर्चेत येतो. त्या बंद पडलेल्या थिएटरचा हुकमी प्रेक्षकवर्ग थोडासा उदास होत आपल्या आठवणीत हरवून जातो इतकेच.... मध्य मुंबईतील सत्तर वर्षे जुने ‘चित्रा’ हे चित्रपटगृह बंद झाल्याच्या वास्तवाने पुन्हा तेच तर घडले. गेल्या काही वर्षात चर्चगेटचे इरॉस बंद आहे ( ते कायमस्वरुपी बंद राहणार की पुन्हा सुरु करणार हे स्पष्ट होत नाही. पण परिस्थिती त्याच दिशेने चाललीय.) कुलाबा येथील रिगल बंद करायला परवानगी मागत आहेत. दादरचे शारदा दीड वर्षांपूर्वी बंद झाले आहे. बोरिवलीतील जया, डायमंड ही थिएटर्स बंद पडल्याची साधी प्रतिक्रियाही उमटली नाही, हे आश्चर्यकारक आहे. मुंबईतील सिंगल स्क्रीन थिएटर बंद पडायला नेमकी सुरुवात झाली ती, १९७२ साली मुंबईत छोट्या पडद्याचे अर्थात दूरदर्शनचे आगमन झाल्यावर, हे फार कोणाच्या लक्षातच येत नाही. त्याचवर्षी गिरगावातील मॅजेस्टिक, बोरिबंदरचे रेक्स, माटुंगा परिसरातील श्री आणि रिव्होली, मग १९७३ साली दादरचे ब्रॉडवे बंद झाले. मुंबईतील जागांचे वाढते भाव हेच ही जुनी थिएटर्स बंद होण्यामागचे कारण असल्याचे तेंव्हा म्हटले गेले. बराच काळ तेच कारण उगाळले गेले. १९८२ साली दूरदर्शन रंगीत झाले व व्हिडिओ आला. दशकभराने उपग्रह वाहिन्यांचे आगमन झाले आणि थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहण्याची गरज थोडी थोड ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .