ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली मुंबईत आणि राज्य चित्रपट महोत्सव इत्यादी.....


राउंड अप 

  ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली मुंबईत आणि राज्य चित्रपट महोत्सव इत्यादी.....   लोकसभा निवडणुक आचारसंहितेमुळे ३० एप्रिल ( दादासाहेब फाळके यांची जयंती) रोजी होणारा राज्य चित्रपट महोत्सव अखेर पार पडला. आपल्याकडील वाढत्या सांस्कृतिक घडामोडी आणि हिंदी मराठीसह एकूणच वाढती प्रादेशिक  चित्रपट निर्मिती ( वार्षिक १८०० चित्रपट) पाहता निवडणूक आचारसंहितेमधून राज्य व राष्ट्रीय पुरस्कार ( ३ मे रोजी होणारा हा महोत्सव यंदा कधी बरे असेल?) वगळावेत यासाठी  नवनिर्वाचित 'कलाकार खासदारां'नी प्रयत्न करावेत. ( देशाच्या विविध भागात मिळून विविध राजकीय पक्षांतून चौदा चित्रपट कलाकार विजयी झालेत.) असो. यंदाचा ५६ राज्य चित्रपट महोत्सव मात्र विशेष ठरला ही चित्रपटसृष्टी आणि रसिकांसाठी आनंदाची गोष्ट आहे. ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली आणि अकादमीच्या गव्हर्नर कॅरल लिटलटन यांच्या भारत भेटीने तसे घडले हे सर्वज्ञात आहे. ऑस्करचे सदस्य उज्जल निरगुडकर यांनी विशेष प्रयत्न केल्याने हे घडले आणि प्रथमच ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली भारतात आले हे विशेष. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी जॉन बेली यांच्या मुंबईतील कार्यक्रमासाठी विशेष रस घेतल्याचे जाणवले. त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन आणि या भेटीतून काही विशेष साध्य करण्याची भावना खूप महत्वाची आहे. मुंबईत ऑस्कर कार्यालय सुरु झाल्यास ते अमेरिका आणि इंग्लंडनंतरचे तिसरे असेल आणि आशियातील चित्रपट ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen