व्हिडीओ मॅजिक- सई ताम्हणकर सोबत...


सिनेमॅजिक म्हटल्यावर व्हिडीओ अपरिहार्यच आहे. दृष्यमाध्यमाविषयी वाचताना जोडीला व्हिडीओ असेल तर लेखाचा आस्वाद अधिक खुलतो.  सिनेमॅजिकमध्ये आजपासून आपण अधूनमधून हा अनुभव घेणार आहेत. लेखांसोबत व्हिडीओ च्या लिंक, स्वतंत्र व्हिडीओ क्लिप्स आणि काही शॉर्ट फिल्म्स सिनेमॅजिकच्या सदस्यांना पहायला मिळणार आहेत. आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. पहिला व्हिडीओ आहे, सई ताम्हणकरचा- सई ताम्हणकरचं नाव ऐकलं की पावलं थबकतात. मराठी पडदा ग्लॅमरस होऊन झळाळू लागतो. लेखक- दिग्दर्शक उपेंद्र सिधये यांचा 'गर्लफ्रेंड' हा चित्रपट पुढच्या आठवड्यात  प्रदर्शित होत आहे. सई ताम्हणकर आणि अमेय वाघ हे यात पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. सईने यातल्या आपल्या भूमिकेविषयी खास सिनेमॅजिक साठी दिलीप ठाकूर यांच्याशी साधलेला हा संवाद [videopress 5KIY6aa4] ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘रुपवाणी’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


सिनेमॅजिक , सई ताम्हणकर

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.