चित्रस्मृती - रामसेबंधूंचा असाही एक जोरका धक्का धीरेसे लगे....


हिंदी चित्रपटसृष्टीतील काही धक्के खूप वेगळे आणि आश्चर्याचे असतात म्हणून.... हीच तर सिनेमाच्या जगाची गंमत आहे. चित्रस्मृती  रामसेबंधूंचा असाही एक जोरका धक्का धीरेसे लगे.... - दिलीप ठाकूर   हिंदी चित्रपटसृष्टीच्या कोणाचा कसा/किती/का/कशाला वाटा असेल हे सांगताना त्याला किती आणि कसे फाटे फुटतील हे सांगता येणे अवघड.... बहुविधता हे आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीचे वैशिष्ट्य. त्यात एक वाटा.... खरं तर हुकमाचा वाटा रामसेबंधूंचा. एव्हाना काहींच्या डोळ्यासमोर 'भीतीचे सावट' येतानाच त्यांच्या दो गज जमीन के नीचे, अंधेरा, हवेली, पुरानी हवेली ( पहिल्याचा सिक्वेल का?), दर0वाजा, बंद दरवाजा ( पुन्हा तोच प्रश्न, हेदेखील सिक्वेल का? पण सत्तरच्या दशकात हिंदी चित्रपटात सिक्वेल संस्कृती नव्हती. इतकेच नव्हे तर या दशकातील चित्रपट संस्कृती वेगळाच अनुभव आहे), और कौन, सबूत, वीराना वगैरे वगैरे बरेच भयपट/भूतपट आले असतील. भले तुम्ही ते पाहिले नसाल पण अशा पिक्चरचा आपला एक हुकमी ऑडियन्स होता. व्यावसायिक चित्रपटात तेच तर महत्वाचे असते. त्या काळात मी गिरगावात राह्यचो आणि या रामसेबंधूंचे ऑफिस मिनर्व्हा थिएटरजवळ होतो. तेथे हे रामसेबंधूनी लावलेल्या  आपल्या प्रत्येक फिल्मची काचभर शो कार्डस व पोस्टर पाह्यला कायम असलेल्या गर्दीत प्रेक्षक म्हणून मी देखिल असे. कालांतराने सिनेपत्रकार म्हणून याच ऑफिसमधे दिग्दर्शक श्याम रामसेच्या मुलाखतीचा योग आला. हा अनुभव अभ्यासपूर्ण होता असे म्हणत तुम्हाला आता कशाला घाबरवून टाकू? हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. gadiyarabhay

      6 वर्षांपूर्वी

    रामसे बंधूंचे चित्रपट, त्याची पोस्टर बघण्यात कॉलेजचे दिवस गेले. दो गज जमीन के नीचे आणि एक ननही मुनही बरे चित्रपट होते

  2. ajitpatankar

      6 वर्षांपूर्वी

    छान माहिती.

  3. vinayakbapat

      6 वर्षांपूर्वी

    नविन माहिती मिळाली.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen