टका टक. . . विवस्त्र करून वर्मी घाव 


हमखास मनोरंजन करणारा आशय प्रेक्षक नक्कीच स्विकारतो. आणि जर चित्रपट पाहून आलेल्या प्रेक्षकांनी त्याची चारचौघात वाहवा केली, तसे मुद्दे चित्रपटात असतील तर तुम्ही व्यावसायिक सिनेकर्मी म्हणून नक्कीच यशस्वी होता हेच टकाटक ह्या सिनेमाने दाखवून दिले आहे.   टका टक. . . विवस्त्र करून वर्मी घाव  हपापलेल्या आणि तुंबलेल्या आंबट शौकीनांना लक्ष करून बनवलेला दिग्दर्शक मिलिंद कवडेंचा टकाटक सिनेमा चौथ्या आठवड्यातही तब्बल 200 चित्रपटगृहात तग धरून आहे. जवळपास दोन महिन्यांपूर्वी ह्या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि युट्युबवर ट्रोल झाला. अश्लिल दृश्य डोळे बंद करून पाहणाऱ्या तथाकथित सुसंस्कृत प्रेक्षकांनी यथेच्छ तोंडसुख घेत आशयघन चित्रपट परंपरेला छेद देणारा चावट, अश्लिल सिनेमा म्हणून चित्रपटाची हेटाळणी केली. तसे करणे स्वाभाविकच होते. कारण ट्रेलरमध्ये जे काही दाखवले ते पाहून “हा काय फाल्तुपणा?”असाच सूर निघाला. पण, हाच सूर चित्रपटगृहात हाऊसफूलची पाटी लावून गेला. असं का घडलं असेल बरं? आपल्याकडे बोल्ड सिनेमे पाहणारा, किंबहूना चावटपणा मनोरंजन म्हणून स्विकारणारा प्रेक्षकवर्ग जास्त आहे. किंवा बदल म्हणून म्हणा किंवा गंमत म्हणून चित्रपट पाहणारा हौशे नवशे प्रेक्षक चित्रपटगृहाकडे वळविण्यात चावटपणा , अश्लिलता यशस्वी होत असावी. अलिकडे वर्षातून एक सिनेमा तसा येतोही....आणि तद्दन चावटपणा, द्वीअर्थी संवाद असलेला चित्रपट हा एखाद्या आठवड्यापर्यंत प्रेक्षकांची शिकार करण्यात यशस्वी होतो. पण, टकाटक हा सिनेमा बॉलीवूड म ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen