फेसलिफ्ट


विसाव्या शतकातील मुंबईचं एक प्रमुख वैशिष्टय म्हणजे गिरण्या आणि त्यात काम करणारे कामगार ! गिरणगावातील या कामगाराच्या कष्टांनी मुंबईत कापड उद्योग उभा राहिला, फोफावला. ऐंशीच्या दशकात झालेल्या कामगारांच्या संपाने गिरणगावाला संपवून टाकलं, कारखाने बंद झाले आणि हळूहळू त्या ठिकाणी टोलेजंग इमारती, मॉल उभे राहिले. आकाशाला भिडलेल्या या इमारतींनी गिरण्यांची व त्यात राबलेल्या कामगारांची उरली सुरली निशाणीही पुसून टाकली. मुंबईत झालेल्या या स्थित्यंतरावर मार्मिक भाष्य करणारा लघुपट निर्माण केला आहे विशाल मोरे याने. सिनेमॅजिकच्या वाचकांसाठी ही दृकश्राव्य भेट. [videopress 0acNPwr8] ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘रुपवाणी’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.प्रतिक्रिया

  1. ajitpatankar

      2 वर्षांपूर्वी

    अप्रतिम लघुपट.. मनाला चटका लावणारा. माझा जन्मच गिरगावातला. १९८० पर्यंतची मुंबई किती छान होती ! लालबाग परळ भागात सर्व सणावारांचा उत्साह पाहण्यालायक होता. १९८० पूर्वी मुंबई व अंबरनाथ पर्यंतचा परिसर manufacturing hub होती. नंतर मुंबईतील जमिनींची किंमत वाढत गेली. मराठी माणूस मुंबई उपनगर आणि मुख्यत: ठाणे-डोंबिवली कडे स्थलांतरित होऊ लागला. सुज्ञ माणसांच्या हे लक्षात आले तेव्हा नंतर मुंबईच्या जीवनशैलीचा पद्धतशीर सत्यानाश करायचे Grand Design किंवा Master plan तयार झाला. त्याची पहिली पायरी कापड गिरण्या बंद झाल्या. लाखो लोकांचे संसार उध्वस्त केले गेले. त्यानंतर एक एक करून मुंबईतील manufacturing कंपन्या बंद पाडल्या गेल्या. तिथे टोलेजंग इमारती, Malls, Business Centers, Commercial Complex उभे राहिले. आणि मुंबई manufacturing hub ऐवजी Service Industry चे केंद्र झाले. मुंबई आता “मुंबई” राहिली नाही. तिला काही चेहरा-मोहरा. आकार-उकार उरला नाही. आता मुंबई फक्त Bollywood साठी ओळखली जाते. आता लघुपटाबाबत... सिनेमा ही मुख्यत: चित्रभाषा आहे. शब्देविण संवादू फार छान सदर केला आहे. संकल्पना, मांडणी, दिग्दर्शन, संकलन, sound design सर्वच बाजू अप्रतिम कृष्णधवल ते रंगीत छायाचित्रण .. इतिहास ते वर्तमान दर्शिविणारे.. छान वाटले.. गिरणीतला कापूस ते खायचा “कापूस” .. ग्रेट... बहुविध साठी खास व्हिडीओ तयार करायची कल्पना छान.. काही काळाने युट्युब वर टाकावी ही विनंती..

  2. Ajitdixit

      2 वर्षांपूर्वी

    Very goodवाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.