कुमारवयातली ‘‘ऍडल्ट ऍक्ट्रेस'’ स्मशानातील ती भयाण शांतता. तिथं पुट्टाचार्य एक अघोरी पूजा करतोय. त्याच्यासमोर बसली असते ती पूर्ण नग्नावस्थेतील उमा. त्याने तिच्या गळ्यात घातलेल्या ताईतचा तिच्यावर अंमल असतो. त्यामुळे ती त्या अघोरी पूजेसाठी शांतपणे बसलेली असते. पुट्टाचार्यचा तो कट नंदीश उधळून लावतो. उमाच्या गळ्यातील ताईत दातानं तोडून टाकतो, तिच्या अंगावर शाल गुंडाळतो. अचानक येणारं हे दृश्य धक्कादायकच होतं. उमाच्या भूमिकेत होती अवघी १४-१५ वर्षांची पद्मिनी कोल्हापुरे. तिनं तिच्या करिअरच्या सुरुवातीलाच नग्न दृश्यांमधून एण्ट्री केली, अन् कुमारवयातली ‘ऍडल्ट ऍक्ट्रेस' म्हणून तिच्यावर शिक्का बसला. ...................................... - अभिषेक खुळे १३ फेब्रुवारी १९८१... ‘गहराई’ प्रदर्शित झाला. आधीचे दोन खेळ सरासरीच गेले. मात्र, नंतर जणू हलकल्लोळ माजला. बॉक्स ऑफिसवर रांगा लागल्या. असं काय होतं या चित्रपटात? तो हॉरर होता, सस्पेन्स होता... पण, एवढंच पुरेसं नव्हतं गर्दी खेचण्यासाठी. तर, एका १४-१५ वर्षांच्या मुलीचा पूर्ण न्यूड सीन होता त्यात. दोन-तीन खेळांनंतर माउथ टू माउथ पब्लिसिटी होत गेली अन् प्रेक्षकांचे जत्थेच्या जत्थे चित्रपटगृहाकडे वळू लागले. अर्थात, यात काही आंबटशौकीन होते, तर काही उत्सुकतेपोटी तिकिटा काढत होते. अवघी १४-१५ वर्षांची पोरगी अन् निर्वस्त्र? चर्चा झडू लागल्या होत्या. ती मुलगी होती, पद्मिनी कोल्हापुरे. संगीतक्षेत्रातल्या मोठ्या घराण्यातील ही लेक बालपणापासूनच महत्त्वाकांक्षी. वडील पंढरीनाथ कोल्हापुरे, आई निरुपमा यांच्या पोटी तीन मुली जन्मल्या. मोठी शिवांगी (आता शक्ती कपूरची पत्नी), मधली पद्मिनी आणि धाकटी तेजस्विनी. कोल्हापुरे घराणं म्हणजे मंगेशक ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
ajitpatankar
6 वर्षांपूर्वीचित्रपटसृष्टी ही एक वेगळीच दुनिया आहे. तिथे टिकून राहाण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात. अर्थात ही वैयक्तिक बाब आहे.. पद्मिनी कोल्हापुरे ही ग्रेट अॅक्ट्रेस कधीच मानली गेली नाही.. एक तर नंदा सारखा तिचा चेहरा बालिश होता. त्यामुळे प्रयत्न करूनही ती glamorous कधीच वाटली नाही. अनेक चित्रपटात पद्मिनी कोल्हापुरे होती, हे मुद्दाम सांगावे लागते. ह्या लेखाच्या निमित्ताने पद्म्मिनी कोल्हापुरेची आठवण झाली.