माणसातला विचित्रपणा आणि इमपरफेक्शन्स साजरी करणारी सोशल मीडिया सेव्ही प्रेम कहाणी!


उपेंद्र सिधये लिखित-दिग्दर्शित ‘गर्लफ्रेंड’ अतिशय स्मार्ट आणि तरीही भावनिक असा “रॉम कॉम” सिनेमा आहे! हा सिनेमा “रॉम कॉम” या जॉनरचे ठराविक ठोकताळे एकीकडे पाळतोही आणि दुसरीकडे ते नव्याने बदलूही पाहतो. त्याचबरोबर आजच्या इन्टरनेट/सोशल मिडिया हिच जीवनशैली असलेल्या पिढीची प्रेमाची बदललेली नवी व्याख्या सुद्धा इथे दिसून येते.

माणसातला विचित्रपणा आणि इमपरफेक्शन्स साजरी करणारी सोशल मीडिया सेव्ही प्रेम कहाणी!

उपेंद्र सिधये लिखित-दिग्दर्शित ‘गर्लफ्रेंड’ अतिशय स्मार्ट आणि तरीही भावनिक असा “रॉम कॉम” सिनेमा आहे! हा सिनेमा “रॉम कॉम” या जॉनरचे ठराविक ठोकताळे एकीकडे पाळतोही आणि दुसरीकडे ते नव्याने बदलूही पाहतो. त्याचबरोबर आजच्या इन्टरनेट/सोशल मिडिया हिच जीवनशैली असलेल्या पिढीची प्रेमाची बदललेली नवी व्याख्या सुद्धा इथे दिसून येते. सर्वप्रथम कौतुक करायला हवं ते अमेय वाघ आणि सई ताम्हणकर या दोघांच्या अफलातून अभिनयाचं! विशेषतः अमेयचं! ‘नच्या’ आजच्या पिढीचा तरुण आहे, ज्याचे प्रॉब्लेम्स् आणि स्वप्नं खरीखुरी आहेत, हे आपल्याला अमेयच्या अतिशय ओरिजनल (जे त्याने आधी वापरलेलं नाही) देहबोलीतून पटतं! तर सईच्या ‘अलिशा’ मध्ये एक वेगळीच अद्भुतता आहे. तिच्या भूमिकेबद्दल अधिक बोलणं ‘स्पॉयलर’ ठरू शकतं, इतकी ती भूमिका गमतीशीर आहे, जी आपण स्वतः अनुभवावी! या दोघांच्या कामांमुळे आणि त्यांच्यातल्या केमिस्ट्रीमुळे सिनेमा अधिक आपला होतो, नाहीतर कदाचित कथानक काहीसे बनावट वाटू शकले असते! लेखक-दिग्दर्शक उपेंद्र ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘रुपवाणी’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


चित्रपट रसास्वाद

प्रतिक्रिया

  1. ajitpatankar

      2 वर्षांपूर्वी

    छान परीक्षण. चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण करणारं ! “रॉम कॉम” (Romantic Comedy) ला Romedy असं ही म्हणतात. बेनेट-कोलमन कंपनीचा ‘Romedy Now” नावाचा टीव्ही चॅनल आहे.वाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.