चित्रस्मृती यश चोप्रांचा दुर्लक्षित 'विजय'चा मुहूर्त मात्र जंगी..... काही काही प्रतिमा अशा आणि इतक्या घट्ट आहेत की त्यापलिकडे जाऊन त्या व्यक्तींच्या प्रगती पुस्तकात डोकावलेच जात नाही. त्या साचेबंद पलिकडे जाऊन त्या कर्तृत्वांचा शोध घ्यायला हवा....दिग्दर्शक यश चोप्रा म्हणजे, रोमॅन्टीक चित्रपटाचे मास्टर पिस हे 'चांदनी' ( १९८९) वेळेस इंग्रजी मिडियाने म्हटलं आणि तीच त्यांची कायमची इमेज झाली. खरं तर हिंदीतील पहिला मल्टी स्टार कास्ट मनोरंजक मसालेदार चित्रपटाचे श्रेय यशजींच्या 'वक्त ' ( १९६५) या चित्रपटाला जाते. अनेक व्यक्तिरेखांना एकाच पटकथेत गुंफण्याचे त्यांचे या चित्रपटाचे कौशल्य म्हणजे हाच त्यांचा चित्रपट माध्यमाचा विचार करता सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरतो. यशजींच्या 'दीवार' ( १९७५)मधील दोन भाऊ ( शशी कपूर व अमिताभ) आणि त्यांची आई ( निरुपा राॅय) यांच्यातील भावपूर्ण नाट्यमय प्रसंग आणि 'मशाल ' ( १९८४) मधील बेलाॅर्ड पिअरच्या रस्त्यावरचा आजारी पत्नीला ( वहिदा रहेमान) डाॅक्टरकडे नेण्यासाठी एकादी गाडी थांबावी म्हणून पतीचा ( दिलीपकुमार) आक्रोश.... यशजी भावनिक दृश्याचे उत्कृष्ट दिग्दर्शक आहेत याचाच प्रत्यय देतात. इमोशनल दृश्य यशजींची मोठीच खासियत. असाच त्यांचा दुर्लक्षित राहिलेला चित्रपट 'विजय '( १९८८). जुहू येथे समुद्रालगत सेन्टाॅर हाॅटेल उभे राहिले तेव्हा तेथे सातत्याने फिल्मी पार्टी होऊ लागल्या, पण त्याची सुरुवात याच 'विजय 'च्या जंगी मुहूर्त आणि पार्टीने झाली हे चांगलेच आठवतयं. या चित्रपटाचे निर्माते सुब्रमणी रेड्डी हे दक्षिणेकडील चित्रपटसृष्टी आणि राजकारणातील मोठेच प्रस्थ, याचा या मुहूर्ताची आमंत्रण पत्रिका हाती आली तेव्हाच प्रत्यय आला. आणि तसाच खणखणीत ह ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .