सुवर्णयुगातले जिवलग बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी म्हणजेच जॉनी वॉकर – म्हणजेच कॉमेडीचा बादशाह . बस मध्ये कंडक्टरची नोकरी करताना प्रवाशांना दारुड्याची नक्कल करून हसवायचा . एकदा सुप्रसिद्ध अभिनेता बलराज सहानींची पारखी नजर ह्या रत्नावर पडली आणि त्यांनी हे रत्न गुरुदत्त समोर पेश केलं. दारूच्या एका थेंबालाही न शिवता अट्टल दारुड्याची हुबेहूब नक्कल करणारा बद्रुद्दीन काझी काय चीज आहे ते गुरुदत्तने पहिल्याच भेटीत ओळखलं. आपल्या “ बाजी “ चित्रपटात त्याला एक छोटीशी भूमिका दिली . गुरुदत्तनेच बद्रुद्दीनचं “ जॉनी वॉकर “ ( त्याकाळी जॉनी वॉकर नावाचा स्कॉच व्हिस्कीचा ब्रॅन्ड जबरदस्त लोकप्रिय होता ) असं नामकरण केलं. जॉनी वॉकरच्या आधीही बॉलीवुड मध्ये अनेक कॉमेडियन्स झाले ( गोप , आगा , मास्टर भगवान , मुक्री ) पण जॉनी वॉकर हा कॉमेडीचा पहिला सुपर सुपर स्टार ठरला. जवळ जवळ ३०० हून अधिक चित्रपटातून त्याने त्याने विनोदी भूमिकांबरोबरच काही चित्रपटात नायकाची व सहनायकाची भूमिकाही केली आहे. बाजी नंतरच्या गुरुदत्तच्या जवळ जवळ प्रत्येक चित्रपटात आपल्याला जॉनी वॉकर दिसतोच दिसतो. त्याच्या साठी खास भूमिका तयार केली जायची , पटकथेत बदल केले जायचे , खास त्याच्यासाठी गाणी लिहिली जायची. जॉनी वॉकर ची बहुतेक लोकप्रिय असलेली गाणी संगीतकार एस.डी.बर्मन आणि ओ.पी.नय्यर यांची आहेत. जॉनी वॉकरचा आवाज आणि त्याची देहबोली इतकी हटके असायची कि त्याची नुसती पडद्यावर एन्ट्री होताच प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू यायचे . हाडकुळा बांधा , सदै ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
jspalnitkar
6 वर्षांपूर्वीछान लेख!! बाकी मोहम्मद रफी जॉनी वॉकर ला आवाज देताना एका वेगळ्याच ढंगात गायचे हे अगदी खरं...त्यामुळेच बहुदा राज कपूर च्या चोरी चोरी मध्ये जॉनी वॉकर च्या तोंडी असलेलं "ऑल लाईन क्लिअर" हे (बघायला आणि ऐकायला) धमाल असलेलं गाणं रफी साहेबांनी गायलंय...बाकी दोन्ही मेलडी वाली गाणी मन्ना डें नी गायली आहेत.. जॉनी वॉकर ला जेव्हा गुरुदत्त च्या ऑफिस मध्ये introduce केलं गेलं तेव्हाही तो दारुड्या माणसाचा अभिनय करतच आला होता आणि हा मनुष्य कधीच दारू पीत नाही हे समजल्यावर गुरुदत्त चकित आणि प्रभावित झाले होते; असा किस्सा मी 2-3 पुस्तकात वाचला आहे...
gadiyarabhay
6 वर्षांपूर्वीदहा कुठे फक्त तीनच गाणी दिलीत. बाकी लेख उत्तम