द बँड्स व्हिजिट


अरबी भाषेत 'प' ऐवजी 'ब' चा वापर केला जातो. त्यामुळे गोंधळ होउन ते पेटा तिकवा ऐवजी वाळवंटी प्रदेशातील बेट हतीकवा या शहरात जातात. आधीच नवखे त्यात हिब्रू भाषा येत नसल्याने त्यांची पंचाईत होते. जवळ पुरेसे पैसेही नाहीत. एका रेस्टॉरंटमध्ये चौकशी करताना कळतं की थेट दुसऱ्या दिवशी सकाळी बस आहे. आता काय करायचं ?

द बँड्स व्हिजिट 

इजिप्तच्या अलेक्झांड्रिया पोलिस ऑर्केस्ट्राला इस्राएलच्या पेटा तिकवा येथील अरब कल्चरल सेंटरने सादरीकरण करण्यासाठी निमंत्रण पाठवलंय. अरबी भाषेत 'प' ऐवजी 'ब' चा वापर केला जातो. त्यामुळे गोंधळ होउन ते पेटा तिकवा ऐवजी वाळवंटी प्रदेशातील बेट हतीकवा या शहरात जातात. आधीच नवखे त्यात हिब्रू भाषा येत नसल्याने त्यांची पंचाईत होते. जवळ पुरेसे पैसेही नाहीत. एका रेस्टॉरंटमध्ये चौकशी करताना कळतं की थेट दुसऱ्या दिवशी सकाळी बस आहे. आता काय करायचं ? बँड म्हटल्यास आपल्या डोळ्यांसमोर काय चित्र येतं ? मंगल कार्यात ट्रम्पेट, क्लैरिनेट, ढोलीबाजा, ताशा, खुळखुळे वाजवणारी भडक रंगातील, युरोपियन पद्धतीचा गणवेश घातलेली लोकं डोळ्यासमोर येतात. बँड वाजवून ते लोकांचं लक्ष कार्यक्रमाकडे वेधून घेत असतात. नीट बघितलं तर असं लक्षात येईल की तिथे सगळ्यात दुर्लक्षित तेच असतात. कुणाचं लक्ष गेलंच तर ते त्यांच्या गणवेशाकडे जातं. त्यावरून त्यांची टर उडवली जाते. त्यांच्या वाजवण्यावरून त्यांची नक्कल केली जाते. खुळखुळे तर कायम चेष्टेचा विषय झालेले आहेत. त्यांचं चालणं, त्यांचं दिसणं यावरून गमती केल्या जातात. गाणं बदलण्यासाठी लोक त्यांना सारखं ओरडत असतात. कुणी नुसत्याच सूचना देत असतो. हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रपट रसास्वाद

प्रतिक्रिया

  1. milindKolatkar

      3 वर्षांपूर्वी

    आवडलं! नक्की पहा - https://youtu.be/F3Wqx1J7UFo पूर्ण चित्रपट!!वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen