संगीतकार खय्याम यांचे निधन (19 ऑगस्ट 2019) हा हिंदी चित्रपट संगीतातील खानदानी माधुर्याचा मृत्यू आहे. खय्याम यांनी शायरी आणि संगीताच्या दर्जाशी कधीही तडजोड केली नाही त्यामुळेच खय्याम यांचे वाईट गाणे शोधूनही सापडत नाही. व्यवहारातील पारदर्शकता आणि स्नेह जणू त्यांच्या संगीतातही अवतरला होता त्यामुळेच त्यांची गाणी ऐकताना आत्मिक शांततेचा अनुभव येतो. सिनेमॅजिकच्या एक सदस्या आणि प्रख्यात गायिका, संगीत अभ्यासक मृदुला दाढे जोशी यांचे 'रहे ना रहे हम' हे पुस्तक गेल्या वर्षी रोहन प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले. विविध संगीतकारांच्या शैलींचे त्यात रसास्वादन आहे आणि अर्थातच त्यात एक प्रकरण खय्याम साहेबांवरही आहे. संगीत अभ्यासक विश्वास नेरुरकर यांनी तर खय्याम साहेबांच्या संबंध कारकीर्दीचा आढावा घेणारं अत्यंत देखणं पुस्तक लिहिलं आहे. खय्याम यांनी विश्वासवर पुत्रवत स्नेह केला. 'रहे ना रहे हम' या पुस्तकाची प्रत देण्यासाठी विश्वास नेरुरकर आणि मृदुला दाढे-जोशी हे खय्याम साहेबांच्या घरी गेले होेते. गप्पा अर्थातच गाण्यांच्या झाल्या. त्यावेळी मृदुला जोशी यांनी आपल्या अत्यंत सुरेल आवाजात खय्याम यांचे एक गाणे सहजपणे सादर केले. 1977 साली आलेल्या शंकर हुसैन या चित्रपटातले ते गाणे म्हणजे एक शब्द-स्वर शिल्प आहे. त्यावेळी खय्याम आणि त्यांच्या पत्नी गायिका जगजीत कौर यांनी दिलेली दादसुद्धा किती सहज आहे पहा. त्या प्रसंगाचा हा व्हीडिओ खास सिनेमॅजिकसाठी. (सोबत संदर्भासाठी संपूर्ण गाण्याचे शब्द देत आहे. गीतकार आहेत कैफ भोपाली. मूळ स्वर अर्थात लता मंगेशकर यांचा.) अपने आप रातों में चिलमनें सरकती हैं चौंकते हैं दरवाज़े,सीढ़ीयाँ धड़कती हैं, अपने आप.... एक अजनबी आहट आ रही है कम-कम सी जैसे दिल ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
SunilJoshi
6 वर्षांपूर्वी