घर बसल्या अधिक समृद्ध मनोरंजन जर जाणत्या प्रेक्षकाला मिळत असेल तर त्याने का सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहण्याचे कष्ट घ्यावे? काय इतकं सोनं लागलंय त्या मोठ्या पडद्याला?वन्स अपॉन अ टाईम इन हॉलीवूड: टॅरेन्टीनोने हॉलीवूडला लिहलेले प्रेमपत्र !
आज आपण अश्या काळात जगत आहोत, जिथे मनोरंजनाची व्याख्या बदलत चालली आहे. सिनेमा या माध्यमाची चुरस आहे ती सिरीज् /वेब शोज या माध्यमांशी! सिरीज हे माध्यम सिनेमापेक्षा अधिक खोलवर परिणाम साधणारं आहे की काय अशी विचारधारा आता निर्माण होत चालली आहे. घर बसल्या अधिक समृद्ध मनोरंजन जर जाणत्या प्रेक्षकाला मिळत असेल तर त्याने का सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहण्याचे कष्ट घ्यावे? काय इतकं सोनं लागलंय त्या मोठ्या पडद्याला? क्वेन्टीन टॅरेन्टीनोचा नवा कोरा सिनेमा ‘वन्स अपॉन अ टाईम इन हॉलीवूड’ या आणि अश्या अनेक प्रश्नांचं तोडीस तोड उत्तर आहे! संकल्पनेपासून, रचनेपासून, अंमलबजावणीपर्यंत ‘वन्स..’ हा नखशिखांत ‘सिनेमा’ आहे. सिनेमा या माध्यमाची सर्वात निखळ, अप्रदूषित व्याख्येची पुन्हा नव्याने जाणीव करून देणारी ही कलाकृती त्या रुपेरी पडद्यावरंच अनुभवावी अशी! तिचा सारा जीवच जणू त्या काळोख्या अवकाशात बसलेला आहे, तिला त्यातून बाहेर आणलं तर, मुक्त सोडलं तर, आपल्या ओंजळीत ती थांबणार नाही, ती तरीही आपल्याला स्पर्शून जाईल कदाचित, पण ती आपल्या खोल आत झिरपणार नाही! हा सिनेमा म्हणजे टॅरेन्टीनोने हॉलीवूडला आणि त्याच अर्थी एकंदरीत ‘सिनेमा’ या मध्यमाला लिहलेलं प्रेम पत्र आहे! टॅरेन्टीनो अनेकदा म्हणाला आहे की त्याच्या सिनेमात दिसणारी हिंसा ही खऱ्या जगातल्या हिंसेसारखी नसते, खऱ्या जगात ती भीषण असली तरी सिनेमात तो हिंसेचा वापर मनोरंजनासाठी करत असतो, निखळ मनोरं ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .