'गंगा जमुना ' जुळे चित्रपटगृह...


'गंगा जमुना ' जुळे चित्रपटगृह... कालांतराने अनेक जुन्या थिएटर्सकडे रसिकांनी पाठ फिरवली तेव्हा सी ग्रेड चित्रपट रिलीज करणे हाच पर्याय उपलब्ध असे. अशाने थिएटरपासून नियमित प्रेक्षक आणखीन दुरावत गेला आणि मग  ते थिएटरच बंद झाले.  चित्रस्मृती  'गंगा जमुना ' जुळे चित्रपटगृह... मुंबई पुण्यातच नव्हे तर देशभरातच जुन्या एकपडदा अर्थात सिंगल स्क्रीन थिएटरचे बंद होणे अथवा त्याची इमारत पाडली जाणे   (त्याच जागी उभ्या माॅलमध्ये काही ठिकाणी छोटी थिएटर्स) हे आता नेहमीचेच झाल्याने दक्षिण मध्य मुंबईतील गंगा जमुना या जुळ्या थिएटर्सवर हातोडा पडून ते जमीनदोस्त होणार या 'रिअॅलिटी 'चे आश्चर्य वाटले नाही. खरं तर २००० सालापासून ही थिएटर्स बंद झाल्यानंतर त्यांना अधिकाधिक अवकळा येत गेली. हळूहळू ती पडकी इमारत जाणवू लागली. अगदी अलीकडेच ही इमारत धोकादायक म्हणून गणली गेली. देव आनंदच्या 'हरे राम हरे कृष्ण '( १९७१) च्या रिलीजने या जुळ्या थिएटर्सचे उदघाटन झाले आणि आम्हा गिरगावकरांपासून बाॅम्बे सेन्ट्रलपर्यन्तच्या चित्रपट रसिकांना आणखीन एक हक्काचे स्थान मिळाले. ते दिवस मेन थिएटरला हिट चित्रपट पंचवीस वा पन्नास आठवड्यांचा मुक्काम करण्याचे होते. पहिलाच हरे राम हरे कृष्ण सिल्हर ज्युबिली हिट. तो जमुनात तशी घौडदौड करीत असतानाच गंगामध्ये  राजेश खन्नाच्या 'दुश्मन 'ने खणखणीत रौप्यमहोत्सवी यश संपादले. अमिताभचे गंगा की सौगंध, मिस्टर नटवरलाल, कालिया, खुद्दार, सुहाग, दोस्ताना, डाॅन  हे सगळेच याच गंगा अथवा जमुनामध्ये सिल्हर ज्युबिली हिट झाले. सुभाष घईच्या दिग्दर्शन पदार्पणातील कालीचरण आणि कर्ज, दिग्दर्शक अनिल शर्माचा पहिला चित्रपट 'श्रध्दांजली ', जॅकी श्राॅफला स्टार करणारा 'हीरो ', सं ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रस्मृती

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen