अभिनेत्री साधनाची संगीतमय वाटचाल- व्हीडिओ


अभिनेत्री साधनाची संगीतमय वाटचाल 2 सप्टेंबर हा अभिनेत्री साधनाचा जन्मदिवस. साधनाच्या वाट्याला पडद्यावर आलेली गाणी पाहून कोणत्याही अभिनेत्रीला तिचा हेवा वाटेल. जिच्या नावावे ‘साधना कट’ ही केशरचना मशहूर झाली ती साधना अभिनेत्री म्हणून काही फार ग्रेट नव्हती. परंतु तिच्या सौंदर्यात एक वेगळेच काहीतरी आकर्षण दडलेले होते आणि डोळ्यांमधील स्वप्नाळू भाव तर वेड लावित असंत. 'आरजू' या चित्रपटातील ‘ऐ फुलोंकी रानी’ या एका गाण्यात तिने सलज्जतेच्या ज्या विविध छटा दाखवल्या त्यांना तोड नाही. निवृत्तीनंतर ती लठ्ठ झाली आणि सौंदर्याला वयाची झळ बसली तेंव्हा तिने सार्वजनिक समारंभांना जाणे बंद केले, कारण तिला रसिकांसमोर असलेली आपली प्रतिमा जपायची होती. अलिकडेच म्हणजे 25 डिसेंबर 2015 ला तिचे निधन झाले. तिच्या स्मरणार्थ आजचा हा व्हीडिओ The unreliable narrator यांच्या सौजन्याने. तिच्या गाण्यांचा आस्वाद घ्या. [videopress YCn8MOqp] ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘रुपवाणी’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


प्रासंगिक , चित्रपट जगत , व्हिडीओ

प्रतिक्रिया

  1. gondyaaalare

      2 वर्षांपूर्वी

    लेखाबरोबर व्हिडिओ जोडण्याची कल्पना छान . साधना ग्रेट अभिनेत्री नव्हती हे विधान धार्ष्ट्याचेच म्हणायला हवं . पण अर्थात खयाल अपना अपना ........वाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.