बाहुबलीच्या दणकेबाज यशानंतर प्रभासच्या साहोचं टीजर जेंव्हा आलं तेंव्हा हा अजून एक भारी सिनेमा असेल असं वाटलं होतं. प्रसिद्धीही जोरात सुरु झाली होती. साडेतीनशे कोटी बजेट आणि निर्मितीसाठी घेतलेला दोन वर्षांचा वेळ यामुळे अजून उत्सुकता निर्माण झाली होती. पण उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणतात तसा हा प्रकार होता. गुरुवारी ऑफिसहून येताना सातारा रोडच्या सिटी प्राईडला शो टाइम्स चेक करण्यासाठी सहज गेलो असता दुसऱ्या दिवशीचे जवळपास सगळे शोज साहोचे आहेत असं दिसलं. तिथल्या गेट किपरशी चर्चा करत असताना तो म्हणाला की 'साहो' हा सिनेमा चालणार नाही. अगोदरच कसा काय अंदाज लावता असं विचारल्यास थिएटरच्या बाहेर लावलेल्या आणि अर्धवट गळून पडलेल्या साहोच्या पोस्टरकडे अंगुलीनिर्देश करत तो म्हणाला की ते पहा, जेंव्हा कधी असं पोस्टर गळून पडतं तेंव्हा सिनेमा चालत नाही. यावर काय उत्तर द्यावं असा प्रश्न मला पडला. हा त्याच्या अंधश्रद्धेचा भाग असू शकतो पण दुसऱ्या दिवशी साहोचे वाईट रिव्ह्यूज यायला सुरुवात झाली होती. बाहुबलीच्या दणकेबाज यशानंतर प्रभासच्या साहोचं टीजर जेंव्हा आलं तेंव्हा हा अजून एक भारी सिनेमा असेल असं वाटलं होतं. प्रसिद्धीही जोरात सुरु झाली होती. साडेतीनशे कोटी बजेट आणि निर्मितीसाठी घेतलेला दोन वर्षांचा वेळ यामुळे अजून उत्सुकता निर्माण झाली होती. ट्रेलरमध्ये प्रभास सोबत श्रद्धा कपूर, जॅकी श्रॉफ, नील नितीन मुकेश, चंकी पांडे, महेश मांजरेकर यांना पाहून अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. पण उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणतात तसा हा प्रकार होता. सिनेमाची कथा वाजी या शहरात घडते. त्या शहरातील उंचच उंच इमारती व्हिडीओ गेम मधल्या सारख्या भासतात. अंगभर टॅटू असलेल्या खतरनाक गुंडांनी तिथे ध ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .