साहो च्या निमित्ताने...


जवळपास ३५० कोटी रुपये खर्च करून बनलेला हा चित्रपट आशय,पटकथा,सादरीकरण आणि अभिनय या सर्व बाबतीत अगदीच सुमार आहे.केवळ मोठंमोठे लोकेशन्स,महागड्या गाड्या, व्हीएफएक्सचा भडिमार आणि अतर्क्य मारधाड या सूत्रांवर मनोरंजनाची व्याख्या ठरवणारा हा चित्रपट पहिल्या आठवड्यात तिकीट खिडकीवर चांगला गल्ला जमवत असला तरी बाहुबलीप्रमाणे प्रेक्षकांच्या पसंतीस मात्र उतरताना दिसत नाही.   साहो च्या निमित्ताने...   गेल्या दशकभरात हिंदी चित्रपट प्रसारित करणाऱ्या वाहिन्यांचा ताबा दाक्षिणात्य सिनेमांनी घेतला आहे. त्यामुळे प्राईम टाईमला तर जवळजवळ हिंदी चित्रपटाचे प्रसारण हद्दपार झाले आहे.प्रचंड मारधाड,आपल्यापेक्षा दुप्पट वयाच्या नायकासोबत नायिकेचा रोमान्स,फँमिली ड्रामासाठी सोडलेल्या जागा , कायम किंचाळत असलेला खलनायक अशा प्रकारचा सर्व मसाला ठासून भरलेल्या पध्दतीचा हा सिनेमाचा प्रकार मोठया प्रमाणात यशस्वी होऊ लागल्यावर व्यावसायिक गणितं जुळून आलेला हा  प्रवाह आता थेट मोठया पडद्यावर अवतरताना दिसतोय. दिग्दर्शक एस एस राजमौलीच्या बाहुबली भाग १ व २ या महत्वाकांक्षी चित्रपटाच्या यशाने आता दाक्षिणात्य चित्रपटांच्या निर्मात्यांसाठी बॉलीवूडसाठी हिंदी  भाषेत आपला चित्रपट बनवून तो वितरित करण्याची दारे खुली झाली आहेत.नुकताच प्रदर्शित झालेला 'साहो' या प्रवाहाचे उत्तम उदाहरण. जवळपास ३५० कोटी रुपये खर्च करून बनलेला हा चित्रपट आशय,पटकथा,सादरीकरण आणि अभिनय या सर्व बाबतीत अगदीच सुमार आहे.केवळ मोठंमोठे लोकेशन्स,महागड्या ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘रुपवाणी’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


चित्रपट जगत

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.