वॉर, पलायनवादी मनोरंजन करणारा सिनेमा


टायगर श्रॉफ प्रत्यक्ष आयुष्यात हृतिक रोशनला आपला आदर्श समजतो. नृत्य आणि एक्शनसाठी तो हृतिकला फॉलो करतो. बलदंड शरीर, पायांमधील लवचिकता आणि फ्री किक मारण्याचं कौशल्य हे या दोघांमधील साम्य आहे. या सिनेमात त्याला हृतिकसोबत काम करायची संधी मिळाली आहे आणि तो त्याच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून उभा राहिला आहे. 'स्टुडंट अपने मेंटर से भी आगे निकल गया' असं एक वाक्य सिनेमात आहे. टायगर श्रॉफ काही प्रमाणात हे सिध्द करतो.

 वॉर, पलायनवादी मनोरंजन करणारा सिनेमा

  गांधी जयंतीच्या दिवशी वॉर नावाची फिल्म प्रदर्शित होणं हा कमाल विरोधाभास आहे. फिल्मकडे फक्त धंदा म्हणून बघणाऱ्यांना औचित्याचं काही देणं घेणं नसतंच मुळी हे खरं. गांधी जयंती ते येऊ घातलेला रविवार असा मोठा वीक एन्ड मिळतोय हेच फिल्मच्या निर्मात्यांसाठी महत्वाचं आहे आणि अपेक्षेप्रमाणे पहिल्याच दिवशी फिल्मनं दणक्यात कमाई केली. हा आठवडा संपेपर्यंत फिल्मनं मोठा आकडा गाठला असेल. हृतिक रोशन, टायगर श्रॉफ हे स्टार आणि त्यांच्या सोबतीला एक्शन, गाणी आणि परदेशातील चकचकीत लोकेशन्समुळे सामान्य प्रेक्षकांची पावलं सिनेमागृहांकडे वळणार हे निश्चित होतं. पण एक फिल्म म्हणून ती कशी झाली आहे हे पाहणं आवश्यक आहे. खालिद (टायगर श्रॉफ) हा 'रॉ' या राष्ट्रीय गुप्तचर संस्थेचा एजेंट आहे. कबीर (हृतिक रोशन) या त्याच्या माजी सीनियर आणि आता देशाशी बेईमानी केलेल्या एजेंटचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी देण्यात येते. दोन वर्षांपूर्वी त्यांची टीम रिझवान ईलयासी या पूर्वाश्रमीच्या गुन्हेगार आणि आता व्यावसायिक झालेल्या आतंकवाद्याच्या शोधात असताना एका हल्ल्यात त्यांचा सौरभ नावाचा सहकारी ऐनवेळी गद्दारी करत ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रपट रसास्वाद

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen