चित्रस्मृती


चित्रस्मृती 

जेव्हा "शोले "मध्ये  डॅनी डेन्झोपा होता....

शीर्षक वाचून एव्हाना दोन तीन प्रतिक्रिया नक्कीच   उमटल्या असतील, रमेश सिप्पी दिग्दर्शित " शोले "वर इतके आणि इतक्यांदा लिहिले गेले आहे की आता नवीन ते काय वाचायला मिळणार? अगदी त्यावर पुस्तकही आले आहे.... आणि असाही प्रश्न असेलच की, गब्बरसिंगच्या भूमिकेसाठी डॅनी डेन्झोपाला विचारले गेले पण त्याच वेळेस तो नरेंद्र बेदी दिग्दर्शित 'खोटे सिक्के 'मध्ये तो डाकू जंगा ( अजित)च्या विरोधात गावाला मदत करीत असलेल्या सात मित्रांपैकी एक होता. तेथे सकारात्मक भूमिका  साकारत असल्याने पुन्हा त्याच पठडीतील 'शोले 'मध्ये विकृत वाटणारा डेंजरस  व्हीलन साकारण्यास असे काय ते आव्हान असे मानतच त्याने "शोले " नाकारला हेदेखील माहित्येय असाही एक सूर एव्हाना उमटला असेल. ( पण कदाचित काहीना आश्चर्य वाटेल पण चित्रपटाच्या जुन्या आठवणीत जाताना 'माहितीतील गोष्टी 'च पुन्हा अतिशय आवडीने  ऐकणारा/वाचणारा मोठा वर्ग आहे) आता एक गोष्ट तुम्हाला सांगायलाच हवी. ती म्हणजे, 'खोटे सिक्के 'देखिल अकिरा कुरोसावा दिग्दर्शित 'सेव्हन समुराय 'वरच बेतला आहे. इतका की त्यात फिरोझ खान आणि एकूण सात मित्र खलनायक डाकूचा खातमा करतात. हा अगदी तद्दन फिल्मी मसाला असलेला सिनेमा होता. 'शोले 'च्या पटकथा व संवादावरची मेहनत ( अर्थात सलिम जावेदचे) आणि त्याचा सत्तर एमएमचा पडदा आणि स्टीरिओफोनिक साऊंड सिस्टीम याचा इफेक्ट जबरा होता. संपूर्ण मुंबई आणि ठाणे, डोंबिवलीत फक्त आणि फक्त मिनर्व्हा चित्रपटगृहातच हा फंडा होता. इतरत्र मात्र हा भव्य चित्रपट पस्तीस एमएमचा पडदा आणि मोनो साऊंड सिस्टीम असा होता. डॅनी डेन्झोपाने 'शोले ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रपट रसास्वाद , चित्रस्मृती

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen