यंदाचं मामि चित्रपट महोत्सवाचं हे २१वं वर्ष! दरवर्षीप्रमाणे यंदाही जगभरातून चित्रपट महोत्सव गाजवलेले प्रसिद्ध सिनेमे प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. अनेक नवीन, प्रथम मामि मधेच प्रदर्शित होणारे सिनेमे ही यात आहेतच! काही नवीन अप्रदर्शित मराठी सिनेमे यात आहेत आणि भारतातल्या इतर भाषांमधले काही सिनेमे सुद्धा!२१ व्या मामि महोत्सवातले अजूनपर्यंतचे सर्वोत्तम पाच सिनेमे!
यंदाचं मामि चित्रपट महोत्सवाचं हे २१वं वर्ष! दरवर्षीप्रमाणे यंदाही जगभरातून चित्रपट महोत्सव गाजवलेले प्रसिद्ध सिनेमे प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. अनेक नवीन, प्रथम मामि मधेच प्रदर्शित होणारे सिनेमे ही यात आहेतच! काही नवीन अप्रदर्शित मराठी सिनेमे यात आहेत आणि भारतातल्या इतर भाषांमधले काही सिनेमे सुद्धा! फेस्टिवलचे चार दिवस होऊन गेले आहेत आणि आता तीन दिवस राहिले आहेत. या चार दिवसात माझ्या पाहण्यात आलेले हे पाच सिनेमे मला विशेष महत्त्वाचे वाटतात. या पाचातला प्रथम सिनेमा आहे यंदाच्या मामि महोत्सवाचा श्री गणेशा करणारा गीतू मोहनदास दिग्दर्शित मल्याळम आणि हिंदी असा द्विभाषिक ‘मुथन’. अनुराग कश्यप या सिनेमाच्या निर्मितीत आहे आणि या सिनेमातले हिंदी संवाद त्याने लिहिले आहेत आणि मुख्य भूमिकेत मल्याळम इंडस्ट्रीचा लाडका स्टार निवीन पॉली ! ‘मुथन’ चे कथानक दोन ठिकाणी घडून येतं. एक मुंबईत आणि दुसरं केरळच्या एका लहानश्या समुद्र किनारच्या गावात. मुंबई स्थित कथानक आपल्या चांगल्याच परिचयाचे वाटते. सलाम बॉम्बे पासून स्लमडॉग मिलियनेर पर्यंत मुंबईच्या अंधारल्या विश्वाची बाजू अनेकदा अनेक सिनेमांमध्ये दिसली आहे. ‘मुथन’ यात स्वतः काहीच भर घालत नाही, मात्र ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .