संगीत क्षेत्रातील एक चालती बोलती दंतकथा काल 82 वर्षांची झाली. त्या दंतकथेची ही सुरेल कथा सांगितली आहे संगीत अभ्यासक आणि जाणकार रसिक लेखक उदय सप्रे यांनी आज मी तुम्हाला एका अशा कलाकाराबद्धल माहिती सांगणार आहे की जो पहिल्यांदा चालायला लागला तेंव्हा ८ वर्षाचा होता.पायाला हाडाचा क्षयरोग झालेला , पायाच्या असह्य वेदनेमुळे जो कळवळायचा , लपालपीच्या खेळात सहज पकडला जायचा कारण डाव्या पायामागची रक्ताची धार सांगायची तो कुठे लपलाय ते ! याच्या गळणार्या रक्त पुवामुळे मोठ्या ४ बहिणी कुठे बाहेर खेळायलाच जात नसंत... वडील गेले ( २४ एप्रील १९४२ ) ४१ वर्षे ३ महिने २३ दिवस त्यांचं वय होतं व याचं वय होतं साडे चार वर्षे ! कोल्हापूरच्या मुक्कामात एका शेतकर्याने दिलेली मुळी उगगाळून लावली व आठ दिवसांत पाय बरा झाला व आठव्या वर्षी हा चालायला लागला पण डावा पाय आखूड राहिला.असा हा कृश चालीचा मुलगा ९ व्या वर्षी छान चालीत गाऊ लागला तो अजून गातोय आजपर्यंत ! चाल नीट नसलेला हा भलत्याच चांगल्या चालीचा निघाला ! ९ व्या वर्षी फिटस् चा आजार झाल्यावर पुढे औषधपाण्याने नव्हे तर शंकरापुढील अखंड ज्योतींनी हा १३ वर्षांनी म्हणजे २२ व्या वर्षी चं फिटस् चं भयंकर दुखणं गेलं! मंडळी हा मुलगा म्हणजे २६ आॅक्टोबर १९३७ रोजी सांगलीला मूळ हर्डिकर आडनांवाच्या पण मंगेशीला स्थायिक झाल्याने आंडनांव मंगेशकर पडलेल्या मास्टर दीनानाथ व शेवंती यांना लता , मीना , आशा व उषा या ४ बहिणींनंतर झालेला ह्रृृदयनाथ ऊर्फ बाळ ! बाळच्या आठवणीतील मास्टर दीनानाथांच्या अनेक आठवणींपैकी एक इथे नमूद करतो..... लता,मीना,आशा,उषा खाली खेळायला गेल्या होत्या.आई स्वयंपाकघरात काहितरी करीत होती.मला शौचाला लागली. सरपटत मी खालच्या संडासात जाऊ ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
shripad
6 वर्षांपूर्वीखूप छान लेख आहे. हा लेख कुठे प्रकाशित झाला त्याचा संदर्भ द्यायला हवा.