जलते है जिसके लिये...शुभ दीपावली 'सिनेमॅजिक' हे 'पुनश्च'चं भावंडं, बहुविधच्या छत्राखाली विस्तारत आहे. कला, भाषा,साहित्य, संस्कृतीचा वसा आधुनिक युगातील डिजिटल माध्यमात सांभाळण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. सुदैवानं त्याला तुम्ही उत्तम साथ देत आहात. आजचा व्हीडिओ हा एक प्रकारे आम्ही जे काही करतो आहोत, त्याचं प्रतिक आहे. श्रेष्ठ ते कधीच नष्ट होत नाही, ते रूप बदलून परत परत आपलं श्रेष्ठत्व सांगण्यासाठी आपल्यासमोर येत असतं. तलतच्या रेशमी, कंपीत आवाजात आपण 'जलते है जिसके लिये' हे गाणं हजारदा ऐकलं असेल आजवर. स्निती शर्मा ही सुंदर आणि सुंदर आवाजाची तरूणी ते नव्या युगाच्या, नव्या तंत्रात गाते तेंव्हा तरुण पिढीलाही ते आवडतं. तलतचं गाणं कायम तलतचंच राहणार आहे, परंतु त्यात स्वतःचं काही घालून एखादी तरूण गायिका ते सादर करते तेंव्हा आपल्या मनाचे 'दिये'सु्ध्दा उदारतेच्या रसिकतेनं उजळले पाहिजे. दिवाळीच्या प्रकाशात हे गाणं ऐका, भूतकाळात जा आणि त्याचा धागा वर्तमानाशी जोडा. आमचे वाचक, श्रोते आणि प्रेक्षक, सगळ्यांना दिवाळीच्या सुरेल शुभेच्छा. [video width="640" height="360" mp4="https://bahuvidh.com/wp-content/uploads/2019/10/jalate-hain.mp4"][/video] ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Rahulmuli
6 वर्षांपूर्वीMarvelous मी सचिनदांचा निस्सिम चाहता आहे. अतिशय तन्मयतेने हे गाईलं आहे आपण.
shripad
6 वर्षांपूर्वीखरेच की. ते मला लक्षात आले नव्हते.
Shrikant Bojewar
6 वर्षांपूर्वीचूक सुधारल्याबद्दल धन्यवाद. नाव स्निती मिश्र असेच आहे आणि ते व्हीडीओत दिलेले आहे.
shripad
6 वर्षांपूर्वीगायिकेचे नाव स्निती मिश्र आहे, शर्मा नाही.
Meenalogale
6 वर्षांपूर्वीअप्रतिम गायन.